Home /News /maharashtra /

Lockdownमुळे कार्यालय बंद असल्याने खासदार पोहोचले थेट शेतात, हातात विळा घेऊन सुरू केली कापणी - पाहा PHOTOS

Lockdownमुळे कार्यालय बंद असल्याने खासदार पोहोचले थेट शेतात, हातात विळा घेऊन सुरू केली कापणी - पाहा PHOTOS

खासदार श्रीनिवास पाटील शेतात कापणी करताना

खासदार श्रीनिवास पाटील शेतात कापणी करताना

MP Shriniwas Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील हे थेट आपल्या शेतात दाखल झाले आणि हातात विळा घेत कापणी सुरू केली.

    सातारा, 10 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारने मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown in Maharashtra) जाहीर केला आहे. शनिवार-रविवार राज्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. वीकेंड लॉकडाऊनमुळे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील (NCP MP Shriniwas Patil) यांचेही कार्यालय बंद आहे. कार्यालय बंद असल्याने खासदारांनी घरी न थांबता थेट आपलं शेत (Farm) गाठलं आणि कामाला सुरुवात केल्याचं पहायला मिळालं. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून खासदार श्रीनिवास पाटील यांनी सकाळीच आपलं शेत गाठलं. शेतात गेल्यावर त्यांनी हातात विळा घेऊन खपली गहू कापून घेतला आणि लॉकडाऊनचा वेळ सत्कारणी लावला. खासदार श्रीनिवास पाटील यांनी हे फोटोजही आपल्या फेसबूक अकाऊंटवर (MP Shriniwas Patil Facebook account) शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेले फोटोज सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "दिवाळीनंतर लावलेला खपली गव्हाच्या कापणीला आला होताच. सप्ताहांताच्या दिवशीचा लॉकडाऊन असल्याने गोटे, कराड येथील संपर्क कार्यालय बंद होते. मोकळा वेळही मिळाला. हातात विळा घेऊन तयार झालेला खपली गहू कापून घेतला आणि हा वेळ सत्कारणी लावला. मध्यंतरी दोन अवकाळी पाऊस झाले त्यामुळे पिकाचे बरेच नुकसान झाले. आता हाताशी आलेल्या खपली गव्हाचे पुन्हा एखाद्या अचानक येणाऱ्या वळीव पावसात नुकसान होण्याआधी कापून घेण्यासाठी संधी मिळाली." आपल्या पोस्टमध्ये ते पुढे लिहितात, "शेतकरी शेतात अपार कष्ट करतो, पिकाला जीवापाड जपतो पण तरीही तो निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून असतो. जोपर्यंत सर्व संकटातून पीक सुखरूप घरात पोहोचत नाही तोपर्यंत काहीच खरं नसतं. म्हणूनच पीकाचं सगळं वेळापत्रक सांभाळून पिकाची आणि जमिनीची देखील निगा घ्यावी लागते, तेंव्हाच ही काळी आई शेतकऱ्यांना भरभरुन देते. गव्हाची कापणी करीत असताना काळ्या आईचे हे ॠण मनोमन स्मरण करीत नतमस्तक झालो."
    First published:

    Tags: Lockdown, Maharashtra, NCP

    पुढील बातम्या