उरणच्या खोपटा पुलाखाली लिहिला होता आक्षेपार्ह मजकूर, दहशत पसरावणारा अटकेत

उरणच्या खोपटा पुलाखाली लिहिला होता आक्षेपार्ह मजकूर, दहशत पसरावणारा अटकेत

उरण तालुक्यातील खोपटा पुलाखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून दहशत पसरवणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख (33) असे आरोपीचे नाव आहे.

  • Share this:

रायगड, 6 जून- उरण तालुक्यातील खोपटा पुलाखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून दहशत पसरवणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख (33) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी उरण कोर्टात हजर केले असता त्याला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर 153अ/ब तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण या कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उरण पोलिसांनी 72 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

MBBS च्या विद्यार्थिनीला मध्यरात्री पार्कमध्ये नेऊन डॉक्टरने केले लैंगिक शोषण

आरोपी अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख याने खोपटा पुलाखाली गुप्त संदेश लिहिला होता. यामुळे परिसरात भीती पसरली होती. उरणच्या खोपटा खाडीवर असणाऱ्या पुलाखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याची माहिती पोलिसांना 2 जून रोजी मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. हा मजकूर अतिरेकी संघटनेकडून लिहिण्यात आला असल्याचे प्राथमिक अंदाज लावण्यात येत होता. यानुसार पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता. अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख याला आज पोलिसांनी अटक केली.

आमदार राम कदमांना राष्ट्रवादी महिला आघाडीने दिला साडीचोळी, बांगड्यांचा आहेर

अमीर शेख हा मूळ सिद्धार्थ नगर, उत्तरप्रदेश येथील राहणारा असून मागील 10 वर्षांपासून तो खोपटा येथे भाडे तत्वावर रहात होता. याबाबत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार देऊन गुप्तता पाळली आहे. त्यामुळे त्याने हा संदेश का व कशासाठी लिहिला आहे. याबाबत माहिती पोलिसांकडून समजलेली नाही. तर अजूनही काही धागेदोरे हाती लागतात का? याबाबत पोलीस यंत्रणा काम करत आहे.

VIDEO:पवार फक्त बारामतीचे नेते, प्रकाश आंबेडकरांचा टोला

First published: June 6, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading