मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

OBC Reservation: ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मंत्रिपदाचा त्याग करणार - विजय वडेट्टीवार

OBC Reservation: ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मंत्रिपदाचा त्याग करणार - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on OBC reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तसेच ओबीसींसाठी मी मंत्रिपद सुद्धा त्यागू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

Vijay Wadettiwar on OBC reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तसेच ओबीसींसाठी मी मंत्रिपद सुद्धा त्यागू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

Vijay Wadettiwar on OBC reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तसेच ओबीसींसाठी मी मंत्रिपद सुद्धा त्यागू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 2 जानेवारी : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावरुन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Vijay Wadettiwar criticise Central Government over OBC's political reservation)

... तर मंत्रिपदाचा त्याग करणार

वेळ पडली तर मी मंत्रिपद देखील सोडेल असा सूचक इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. कुणीही कायमचे सत्तेसाठी आलेले नसतात काहींनी 'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हटलं होतं' अस बोलत फडणवीस यांना देखील डीचवल. तर ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा असून त्यासाठी मी मंत्रिपद देखील त्यागू शकतो असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला. जर महाराष्ट्र सरकारकडून ओबीसींवर अन्याय झाला तर मी काय करावं? हे मुख्यमंत्री यांना विचाराव लागेल असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वाचा : भारतात या महिन्यात शिगेला पोहोचणार कोरोना रुग्णांची संख्या; दररोज आढळणार 2 लाख नवे रुग्ण?

ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली येथे प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवार यांच्यासह जेष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतल्या. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र ही तांत्रिक बाब आहे यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे. यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले होते.

निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने राज्य सरकारचा हा प्रस्ताव फेटाळत निवडणुका निश्चित वेळेनुसारच होणार असल्याचं म्हटलं. त्यानुसार 21 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडल्या आहेत. तर, ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारी रोजी होणार आहेत. तर सर्व जागांची मतमोजणी 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

26 जानेवारीपासून ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा - पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन 26 जानेवारीपासून मी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, ही निवडणूक ओबीसीसाठी काळी निवडणूक आहे. ओबीसीचे आरक्षण गमावून महाविकास आघाडीचे नेते भाषण करतात. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होते.. हे दुर्दैव महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात फक्त तारखा दिल्या, काहीच केलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात.

First published:

Tags: BJP, Reservation, Vijay wadettiwar, महाराष्ट्र