मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इम्पिरिकल डेटासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

इम्पिरिकल डेटासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल, विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी  (OBC Reservation)महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी (OBC Reservation)महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी (OBC Reservation)महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नागपूर, 18 जून: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी (OBC Reservation)महत्त्वाची माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात रिव्हयू पिटीशन (Review Petition) दाखल करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

इंम्पेरीयल डेटा (Empirical Data)गोळा करण्याचं काम आयोगाकडे देणार आहोत, आयोगाला कोरोना काळात डेटा गोळा करणं अवघड आहे. केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा आहे. हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे केंद्राकडून हा डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

ओबीसींचा इंम्पेरीयल डेटा मागण्यासाठी केंद्र सरकारला दोन पत्र लिहिली आहेत. पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्रीही पंतप्रधानांना बोलले. इंम्पेरीयल डेटा उपलब्ध न झाल्याने राज्यातील 40 ते 45 हजार जागांवर प्रश्न निर्माण झाला आहे. यात महानगरपालिका, सहकार क्षेत्र ते ग्रामपंतायत आणि इतर जागा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं वडेट्टीवार म्हणालेत.

हेही वाचा- राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट आला

केंद्र सरकार इंम्पेरीयल डेटा देत नाही. याबाबत केंद्र सरकारला निर्देश द्यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात रिव्हयू पिटीशन दाखल करणार असल्याचं माहिती देत ओबीसींच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारने बघावं. यासाठी 26/27 तारखेला चिंतन बैठक बोलावली असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

चिंतन बैठकीचं उद्घाटन छगन भुजबळ करणार असून यात सर्व पक्षीय नेत्यांना बोलावणार आहे. या बैठकीस 300 प्रतिनिधी येणार आहेत. चिंतन बैठकीत ओबीसीच्या लढ्याबाबत पुढची दिशा ठरणार असल्याचं ते म्हणालेत. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा- मोठी बातमी:  एन्काऊंटर स्पेशालिस्ट  प्रदीप शर्मांनंतर NIA च्या रडारवर कोण?

भाजपला खरंच ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. मी ओबीसींच्या कुठल्याही संघटनेत नाही, पण ओबीसींच्या हक्कासाठी मी लढतोय, असं वडेट्टीवार म्हणालेत.

First published:

Tags: Supreme court, Vijay wadettiwar, ओबीसी OBC