Home /News /maharashtra /

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार पार, तरीही नवी आकडेवारी दिलासादायक!

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार पार, तरीही नवी आकडेवारी दिलासादायक!

पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाची साथ आता ग्रीनझोनमधील झोपडपट्ट्यांमधून मोठ्या झपाट्याने पसरत असल्याचं आढळून आलं आहे.

पुणे, 10 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. आज पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही 10 हजारांवर पोहोचली आहे. राज्यात दहा हजारांचा टप्पा पार केलेला पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात राञीतून 53 रूग्णांची वाढ झाली आहे. आज सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात कोरोबाधित रुग्णांची 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. परंतु, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असली तरी   जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्याची संख्या दुप्पट आहे. पुणे शहरात आत्तापर्यंत 6000 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.  सध्या जिल्ह्यात 3190 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.  कोरोनाशी बरे होण्याचा दर हा  63 टक्के इतका आहे. हेही वाचा -कधी संपणार कोरोनाचा प्रभाव? 511 तज्ज्ञांनी 'या' संशोधनातून दिलं उत्तर तर दुसरीकडे, लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात शहरात अटी शिथिल करण्यात आल्या आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. अडीच महिने जे ग्रीन झोन राहिलेले भाग होते. ते  आता रेड झोन होत आहे. पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाची साथ आता ग्रीनझोनमधील झोपडपट्ट्यांमधून मोठ्या झपाट्याने पसरत असल्याचं आढळून आलं आहे. खासकरून सिंहगड रोडवरील पाणमळा आणि जनता वसाहतीमध्ये तर कोरोना रूग्णांची  संख्या  9 जून पर्यंत 350 च्यावर पोहोचली आहे. त्यामुळे पालिकेनं हा परिसर पत्रे ठोकून सील करून टाकला आहे. हेही वाचा -धक्कादायक, मनसेच्या नेत्याने हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णाला पळवले गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेली सुट आणि अनलॉक नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून संख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर आता बोपोडी नवा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून पुढे येताना दिसतोय कारण गेल्या चारच दिवसात तिथं तब्बल 94 पेशंट्स आढळून आले आहेत.  पुणे शहरात रुग्ण बरं होण्याची टक्केवारी कशी वाढत गेली ? 30 मार्च - बाधित 43 ,डिस्चार्ज 16 ,रिकव्हरी 37.21 टक्के 4 एप्रिल - बाधित 158, डिस्चार्ज 29 ,रिकव्हरी रेट 18.35 टक्के एप्रिल -15 बाधित 437, डिस्चार्ज 43,रिकव्हरी रेट 9.61 टक्के एप्रिल 22 - बाधित 813 ,डिस्चार्ज 104,रिकव्हरी रेट 12.79 एप्रिल 28 - बाधित 1491 ,डिस्चार्ज 230 रिकव्हरी रेट 15.43 टक्के 3 मे  - बाधित 2051 डिस्चार्ज 499 ,रिकव्हरी रेट 24.76 टक्के 10 मे - बाधित 2857 डिस्चार्ज 1139 रिकव्हरी रेट 39.87 टक्के मे 17 बाधित 4018 डिस्चार्ज 2014 ,रिकव्हरी रेट 50.12 टक्के जून 7 - बाधित 9537, डिस्चार्ज 6053, रिकव्हरी रेट 63.46  टक्के संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: पुणे

पुढील बातम्या