अंगणवाडीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याचा न्यूड फोटो, मंत्री यशोमतींनी दिले कठोर आदेश

अंगणवाडीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिकाऱ्याचा न्यूड फोटो, मंत्री यशोमतींनी दिले कठोर आदेश

प्रकल्प अधिकाऱ्यानं बेशरम पणाचा कळसच केला आहे. अधिकाऱ्यानं चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पोस्ट केला होता.

  • Share this:

अमरावती/बीड, 22 जुलै: महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता तर प्रकल्प अधिकाऱ्यानं बेशरम पणाचा कळसच केला आहे. अधिकाऱ्यानं चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पोस्ट केला होता. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

हेही वाचा....बेशरमीचा कळस! प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

'News18 लोकमत'ने या प्रकरणी सगळ्यात आधी वृत्त दिले होते. या प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दखल घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या अधिकाऱ्याविरोधात महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी या अधिकाऱ्याला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं होतं. आता त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाईल, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

बीड शहरातील ही घटना असून बुधवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. जगदीश मोरे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. या प्रकारामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पूर्वीही या अधिकाऱ्यानं त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती.

Beed Icds urban नावाच्या महिलांच्या ग्रुपवर प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे यानं स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट करून चावटपणा केला होता. या प्रकारामुळे अनेक महिला ग्रुपमधून बाहेर पडल्या. या प्रकारामुळे काही महिलांच्या घरी भांडणही झाली. अंगणवाडी महिलाच्या ग्रुपवर असेही प्रकार चालतात काय, असं काही महिलांना त्यांच्या पतीनं सुनावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारामुळे महिला प्रचंड चिडल्या आहेत. याप्रकरणी अंगणवाडी महिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

बेशरम अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. काम करताना सतत त्रास देत असल्याचा महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या अगोदर महिलां कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक केल्यामुळे या बेशरम अधिकाऱ्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा...धक्कादायक! कारमध्ये तरुणीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर सोडलं

दुसरीकडे, अंघोळ करतानाचा न्यूड फोटो मोबाइल हॅक करून बदनामी केल्याच्या अधिकाऱ्यांनं बनाव केला आहे. मात्र, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि महिला आक्रमक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 22, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading