कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको

आयकर विभागाने आज नाशिक जिल्ह्यातील काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारल्यामुळे याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आज लिलावावर बहिष्कार घातलाय. तर बोटावर मोजण्याइतक्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली म्हणून आम्हाला का वेठीस धरता म्हणून शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको केलाय.

  • Share this:

मनमाड, 14 सप्टेंबर : आयकर विभागाने आज नाशिक जिल्ह्यातील काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारल्यामुळे याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आज लिलावावर बहिष्कार घातला त्यामुळे मनमाड,लासलगाव,चांदवड,येवला,नांदगाव सह नाशिक जिल्ह्यतील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहे. पहाटेपासून हजारो शेतकरी कांदा घेऊन बाजार समित्यांमध्ये आले होते मात्र व्यापाऱ्यांनी अचानक बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले.

अगोदरच कांद्याचे भाव कोसळत असून सध्या पाऊस ही सुरु आहे जर लिलाव नाही झाले तर कांदा भिजून खराब होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही मोजक्या व्यापाऱ्यावर धाडी पडल्या असताना इतर व्यापाऱ्यांनीही लिलाव बंद पाडून आम्हाला वेठीस का धरलंय. असा संतापजनक सवाल शेतकऱ्यांनी केलाय.

दरम्यान, व्यापाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक लिलाव बंद पाडल्यामुळे चांदवड भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको केला. या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती.

First published: September 14, 2017, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading