तूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार

तूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार

शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर : सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तूर डाळ 55 रु. किलो या भावानं विकणार आहे. शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतलाय. आणि व्यापाऱ्यांनी जादा पैसे घेऊ नये, म्हणून तूरडाळीच्या पॅकेटवर 55 रु. किलो अशी एमआरपीही छापण्यात येणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

सरकार विकणार तूर डाळ

- व्यापाऱ्यांना 50 रु. किलोनं विकणार

- पॅकेटवर 55. रु. एमआरपी छापणार

- एक आणि पाच किलोची पॅकेट्स

- सरकारकडे 25 लाख क्विंटलचा साठा

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 09:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading