मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता शिवसेनेकडूनही गडकरींना जाणार पत्र, सेनेच्या नेत्याने केला खुलासा

आता शिवसेनेकडूनही गडकरींना जाणार पत्र, सेनेच्या नेत्याने केला खुलासा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसंच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसंच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसंच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

  • Published by:  sachin Salve
किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 15 ऑगस्ट : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना पत्र लिहून शिवसैनिकाची तक्रारच केली होती. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. अखेर सेनेकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'कामात कुणीही अथवा शिवसेनेने महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही', असं सेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraje desai) यांनी खुलासा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसंच रस्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

आजोबांकडून घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली त्यानेही केलं शोषण, मग भावानेही

रस्ते कामात कुणीही अथवा शिवसेनेने महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही. त्यामुळं गडकरी यांनी जे पत्रात लिहिलं आहे, तसं काही झालं नसल्याचं समजलं आहे. मी आता या विषयी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून कळविणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितलं. शिवाय यापुढे विकास कामात कोणीही अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश ही दिले आहे. बच्चू कडूंनी नितीन गडकरींचं कौतुक दरम्यान, आज बुलडाणाच्या शेगावमध्ये राज्य मंत्री बच्चू कडू आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी ही स्तुती सुमने उधळल्याचं आज पहायला मिळालं. पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही' गुलाबराव पाटलांचा इशारा 'केंद्रातील वरिष्ठ नेत्यांवर बोलताना बाकीचे भाषण करतात, आणि नितीन गडकरी काम करतात', असा टोला लगावत नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. नाना पटोलेंचा नितीन गडकरींना पाठिंबा दरम्यान, नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केली आहे. या पत्रावर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला. विराटने इंग्लंडमध्ये फडकवला तिरंगा, टीम इंडियाच्या उपस्थितीत ध्वजारोहण 'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, गेली 25 वर्ष हे दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा यांना काही अडचण नव्हती' अशी शंका नाना पटोलेंनी व्यक्त केली. तसंच, 'राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर कॉंग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला भष्ट्राचार व कामाचा निकृष्ठ दर्जा हे व्यवस्थित करावे व याची श्वेत पत्रिका काढावी' अशी मागणी पटोले यांनी केली.
First published:

Tags: Congress, Nitin gadkari, Shivsena

पुढील बातम्या