मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही'', संजय राऊतांचा पुन्हा पलटवार

''चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही'', संजय राऊतांचा पुन्हा पलटवार

  भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत.

भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत.

आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नागपूर, 21 फेब्रुवारी: सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. काल शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपसाठी आक्षेपार्ह शब्दांचा (offensive language) वापर केला. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP state president) चंद्रकांत पाटील यांनी त्याच भाषेचा वापर करुन संजय राऊतांना उत्तर दिलं आहे. संजय राऊतांना आता चौकशी होणार कळल्यामुळे ते सैरभैर झालेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा त्यांचा पक्ष दिवसागणिक झिजतो आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

''महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे असं मुळीच वाटत नाही''

पुढे संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे असं मुळीच वाटत नाही. जे महाराष्ट्रद्रोही आहे, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्र विषयी द्वेष आहे अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहे. अशा नरा मोजूनी मारव्या पैजा हजार...मारावी हजार आणि मोजावी एक... त्यांची काय पूजा करावी... त्यांची का मिरवणूक काढावी... जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

संजय राऊतांना आता चौकशी होणार कळल्यामुळे ते सैरभैर झालेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली असून संजय राऊत यांना आवरा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.हे बोलताना चंद्रकांत पाटील यांनीही त्याच आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय. हे लोक चु# आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. किरीट सोमय्यांनी सवाल उपस्थित केला होता की, केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का?

त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की, असं कोण म्हणालं? देशात असे चु## लोक खूप आहेत. अशा लोकांना प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा चु## लोकांना 2024 नंतर संपवून टाकेल. 2024 नंतर देशातील राजकारण अत्यंत पारदर्शक असेल. 10 मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा चु## लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Sanjay Raut (Politician), Shivsena