मुंबई, 14 जुलै: गेल्या दीड वर्षापसून कोरोनानं (Corona) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील (Medical field) सर्वच कर्मचारी अहोरात्र मेहनत करून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. सर्व वैद्यकीय अधिकारीही अहोरात्र मेहनत करत आहेत. आता या वैद्यकीय सेवेशी निगडित अधिकाऱ्यांच्या (Medical services) निवृत्तीबाबत (Retirement) ठाकरे सरकारकडून (Government of Maharashtra) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणतः वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होणारे अधिकारी आता 62व्या वर्षी निवृत्त होणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (Public Health Department)आरोग्य सेवांशी जोडलेल्या कार्यालयांमध्ये वैद्यकीय सेवांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ पदांवर काम अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय आता 62 वर्ष करण्यात आलं आहे.
हे वाचा - पुण्यात रुग्ण घटले पण धोका टळला नाही! अॅक्टिव्ह रुग्णांबाबतीत हाच जिल्हा टॉपवर
तसंच लवकरात लवकर डॉक्टरांच्या रिक्त जागा (Doctor Recruitment) भरण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मुद्यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासह राज्यातील सार्वजनिक सेवेशी संबंधित कर्मचार्यांच्या 7 व्या वेतन आयोगाच्या आधारे वेतनवाढीशी संबंधित प्रक्रिया निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बुधवारी बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही चर्चा झाली आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Government, Maharashtra News, Medical exams