..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल!

..आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हा मोठा बदल!

संपूर्ण देशात आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी एकसारखेच राहणार असून, त्यावर मायक्रोचीप आणि क्यूआर कोड सुद्धा असणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी म्हणजेच संपूर्ण देशात आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी एकसारखेच असणार आहेत. येत्या जुलै-2019 पासून देशातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात हा निर्णय लागू केला जाणार आहे. या नव्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये पहिल्यांदाच क्यूआर कोड आणि NFC सुविधा वापरण्यात आलीय. देशात दररोज 32 हजार ड्रायव्हिंग लायसन्स दिले जातात किंवा त्यांचं नुतनीकरण केलं जातं. तर देशभरात दररोज 43 हजार गाड्यांची नोंदणी केली जाते. त्यामुळे यानिर्णयामुळे वाहनधारकांसह ट्राफीक पोलीसांनाही मोठा फायदा होणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) आणि गाडी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (नोंदणी प्रमाणपत्र) एकसारखेच असणार आहेत. त्यांचा रंग आणि डिझाईन तसेच सिक्युरिटी फिचर्स सर्व काही एकसारखेच असणार आहेत. या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये मायक्रोचीप आणि क्यूआर कोड सुद्धा असणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी हे मेट्रो आणि एटीएम कार्डसारखे नियरफील्ड कम्युनिकेशन (NFC) असणार आहेत. ट्रॅफिक संदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना या नव्या कार्डद्वारे लवकर मिळू शकेल. दिव्यांग चालकांचा विचार करून खास डिझाईन करण्यात आलंय. प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये राहणार असल्याची माहिती रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. जर एखाद्या व्यक्तीला प्रदुषणासंबंधी चाचणी करायची असेल तर त्याला गाडी मालकांची परवानगी घ्यावी लागत होती, परंतु, आता त्याची गरज नाही, असंही या अधिकाऱ्याने सांगितले.

 सनी लिओन नवऱ्यासोबत एंजाॅय करतेय सुट्टी, शेअर केले PHOTOS

First published: October 14, 2018, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading