मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आता काशीला जाऊन आंघोळ करा', सदाभाऊ खोतांनी उडवली राजू शेट्टींची खिल्ली

'आता काशीला जाऊन आंघोळ करा', सदाभाऊ खोतांनी उडवली राजू शेट्टींची खिल्ली

'त्यांना आमदारकी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा आत्मक्लेश यात्रा काढावी'

'त्यांना आमदारकी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा आत्मक्लेश यात्रा काढावी'

'त्यांना आमदारकी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा आत्मक्लेश यात्रा काढावी'

  • Published by:  sachin Salve

नांदेड, 04 ऑगस्ट : राज्याल नियुक्त आमदारांचा (mlas appointed by governor) तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह आहे. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetty) यांचं नाव यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. एकेकाळी राजू शेट्टींसोबत असलेले माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी आता त्यांनी काशी पर्यंत आत्मक्लेश यात्रा काढावी, अशी खिल्ली उडवली आहे.

नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यामुळे चांगलाच हल्ला चढवला.

'आमच्या वेळेस सरकारकडून भ्रमनिराश झाल्याचे सांगून राजू शेट्टी यांनी पाठिंबा काढून आत्मक्लेश यात्रा काढली होती. आता माझी काशी झाली म्हणून त्यांनी काशीपर्यंत यात्रा काढावी' असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला.

अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

तसंच, 'आम्ही मागच्या वेळेस एनडीएसोबत आघाडी केली होती. तेव्हा राजू शेट्टी यांना दिलेला शब्द पाळला होता. तरीही राजू शेट्टी म्हणाले होते, या सरकारकडून माझा भ्रमनिराश झाला आणि त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली होती. शेतकऱ्यांच्या नावाने पाठिंबा काढून घेतला होता. आता राज्यात अतिवृष्टी झाली. महापुरामुळे नुकसान झालं. पीक विमा मिळाला नाही दुधाला भाव नाही, एफआरपी मिळाला नाही मग आता भ्रमनिराश कसा झाला नाही, असा सवाल खोत यांनी राजू शेट्टींना विचारला.

दोन मुलांवर प्रेम करणं मुलीच्या अंगाशी, Boyfriendकडून अश्लील फोटो व्हायरल

'राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार अशी त्यांना आशा होती, पण आता त्यांचं नाव वगळण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे आता त्यांना आमदारकी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा आत्मक्लेश यात्रा काढावी. मी त्यांच्याकडे गेलो आणि माझी काशी झाली म्हणून त्यांनी काशीपर्यंत यात्रा काढावी आणि काशीला जाऊन आंघोळ करावी, असा सल्लावजा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.

First published:

Tags: Raju shetty, Sadabhau khot, राजू शेट्टी