मुंबई, 24 जून : विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांचे राज्यपालांना (Maharashtra governor bhagat singh koshyari) पत्र पाठवले आहे. गेल्या दोन दिवसात घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या 48 तासात 160 च्यावर आदेश काढल्याचा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (opposition leader pravin darekar) यांनी केला आहे. यावेळी दरेकर म्हणाले की या सरकारला कुठेतरी अस्थिरता वाटत असल्याने अवघ्या दोन दिवसांत आदेशावर आदेश काढत आहेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे ते राज्यपालांना पत्र पाठवून या आदेशाची चौकशी करावी असे त्यांनी राज्यापालांना सांगितले आहे.
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत त्यांनी पत्र पाठवले आहे. याचबरोबर दरेकर यांनी राज्यापालांच्या पकृतीचीही विचारपूस केली आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का; हे 34 बंडखोर आमदार ठरणार अपात्र?
काय म्हणाले आहे दरेकर…
एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.
अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे.
अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.
हे ही वाचा : शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक; उद्धव ठाकरेंनी रणनिती बदलली?
महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधींच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. असे प्रवीण दरेकर यांनी पत्र दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Governor bhagat singh, Pravin darekar, Uddhav Thackeray (Politician)