मुख्यमंत्री-एसटी युनियन चर्चा फिस्कटली; संप अटळ

मुख्यमंत्री-एसटी युनियन चर्चा फिस्कटली; संप अटळ

एसटी युनियनने 10 हजार रुपये हंगामी वेतन वाढ देण्याची मागणी केली.ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही. त्यामुळे ही चर्चा फिस्कटली. मुख्यमंत्र्यांचे संप मागे घेण्याची मागणी केली. एसटी कामगार युनियन मात्र संपावर ठाम राहिलीआहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

  • Share this:

16 आॅक्टोबर :ऐन दिवाळीत ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन समजली जाणाऱ्या एसटीच्या संपावर तोडगा अखेर  निघालेलाच नाही.  आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली.पण ही चर्चा फिस्कटल्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम राहणार आहे.

या बैठकीत एसटी कामगार संघटनांनी 7 वा वेतन आयोग लागू करण्याची लेखी हमी आणि 10 हजार रुपये हंगामी वेतन वाढ देण्याची मागणी केली.ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही. त्यामुळे ही चर्चा फिस्कटली. मुख्यमंत्र्यांचे संप मागे घेण्याची मागणी केली. एसटी कामगार युनियन मात्र  संपावर ठाम राहिलीआहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही हा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील मागणी एसटी कामगारांनी केलीये. मात्र त्यांनी ती मान्य करण्यास नकार दिला आहे. एक जुलैपासून देय असलेला सात टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला असून, त्याला एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर जानेवारी 2017 पासून राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के महागाई भत्ताही एसटी कर्मचाऱ्यांना लागू केला नाही. महागाई भत्ता संपूर्ण थकबाकीसह कामगारांना त्वरित देण्याची मागणी संघटनेने केली होती.

 

First Published: Oct 16, 2017 08:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading