• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • महिनाभर फेऱ्या मारूनही नाही झालं काम; दिव्यांग शेतकऱ्यानं तहसिल कार्यालयातच घेतलं विष

महिनाभर फेऱ्या मारूनही नाही झालं काम; दिव्यांग शेतकऱ्यानं तहसिल कार्यालयातच घेतलं विष

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

मागील एक महिन्यांपासून सरकारी कार्यालायचे हेलपाटे मारूनही मागणी पूर्ण न झाल्यानं एका दिव्यांग शेतकऱ्यानं तहसील कार्यालयाचं विष (Handicapped Farmer took Poison ) घेतलं आहे.

 • Share this:
  अमरावती, 28 जून: मागील काही दिवसांपासून राज्यात सतत लॉकडाऊनची (Lockdown) अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी कामांसाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहे. सतत हेलपाटे मारूनही मागणी पूर्ण न झाल्यानं एका दिव्यांग शेतकऱ्यानं तहसील कार्यालयाचं विष (Handicapped Farmer took Poison ) घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Tried to commit suicide) केला आहे. या घटनेनं तहसील कार्यालयात बराच काळ गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर उपस्थित लोकांनी तहसीलदारांच्या चारचाकीनं शेतकऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सचिन रामेश्वर वाटाणे असं विष घेतलेल्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते चांदूरबाजार येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे ते दिव्यांग असून आपली समस्या घेऊन ते मागील एका महिन्यांपासून सरकारी कार्यालयाच्या दारी हेलपाटे मारत होते. तरीही त्याच्या समस्येकडे सरकारी बाबू दुर्लक्ष करत होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या सचिन वाटाणे या दिव्यांग शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. लोकशाहीनं दिलेल्या वृत्तानुसार, वहिवाटीचा रस्ता शेजाऱ्याच्या शेतकऱ्यानं बंद केल्यानं या दिव्यांग शेतकऱ्याचे हाल होतं होते. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी वाटाणे मागील एक महिन्यापासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत होते. पण त्यांचं ऐकूण घ्यायला कोणीही तयार होतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांच्या दालनातच विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा- लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल विष घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला तातडीनं तहसीलदारांच्या वाहनानं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण सचिन यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावं लागलं. याठिकाणी सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून अद्याप प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या घटनेनं तहसीलदार कार्यालयात एकच गोंधळ उडाला असून आतातरी संबंधित शेतकऱ्यांची समस्या मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: