मराठा आरक्षण: 10 ऑक्टोबरच्या बंदला पाठिंबा नाही, खासदार संभाजीराजेंची घोषणा

मराठा आरक्षण: 10 ऑक्टोबरच्या बंदला पाठिंबा नाही, खासदार संभाजीराजेंची घोषणा

'कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. अनेक दिवस बंदच होता त्यामुळे लोकांना आर्थिक फटका बसलाय. आता पुन्हा बंद परवडणारा नाही.'

  • Share this:

मुंबई 02 ऑक्टोबर: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापलं आहे. सुप्रिम कोर्टाची स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदला आपला पाठिंबा नसल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. अशा बंदमुळे काहीही साध्य होणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केले.

संभाजीराजे म्हणाले, कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. अनेक दिवस बंदच होता त्यामुळे लोकांना आर्थिक फटका बसलाय. आता पुन्हा बंद परवडणारा नाही. या घोषणेला समाजाचा पाठिंबा नाही. अशी आंदोलने फायद्याची नसतात असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता काही मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन करत 52 टक्के असलेल्या OBC समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्या असं म्हटलेलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला ईडब्लूएस कोट्याचून आरक्षण देण्याचा निर्णय झाला. गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय झाला पण 52 टक्के ओबीसींसाठी या विषयाची चर्चा करणे गरजेचे आहे. मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही असंही त्यांनी ठासून सांगितले.

Gandhi Jayanti 2020: गांधीजींचा फोटो पहिल्यांदा भारतीय चलनी नोटांवर केव्हा आला?

मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा आज ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.  लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी यावर मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू असा असा इशारा OBC संघर्ष सेनेने दिला आहे.

ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52 टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव आंदोलन करणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

'में किसी से नहीं डरूंगा' राहुल गांधींचा आक्रोश; UP पोलिसांकडून 48 पानी FIR दाखल

मराठा समाजाच्या अनेक संघटनांतर्फे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करून ओबीसींच्या आरक्षणातून कोटा देण्याची मागणी होत आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य असून ओबीसींवर अन्याय करणारी आहे. त्याबद्दलचे सविस्तर निवेदन  मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे पाठवित आहोत असेही संघर्ष सेनेने म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या