मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Hingoli: मुलींना कपडे घेण्यासाठीही नव्हते पैसे; हताश पित्याने उचललं धक्कादायक पाऊल

Hingoli: मुलींना कपडे घेण्यासाठीही नव्हते पैसे; हताश पित्याने उचललं धक्कादायक पाऊल

Suicide in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

Suicide in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

Suicide in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

  • Published by:  News18 Desk
हिंगोली, 05 डिसेंबर: हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लेकींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याच्या (Not have money to buy cloth for daughter) कारणातून येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या (Father commits suicide by drinking poison) केली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. औंढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. केवळ मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून वयोवृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विठ्ठलराव अमृतराव पोले असं आत्महत्या करणाऱ्या 60 वर्षीय पित्याचं नाव असून ते शेतकरी आहेत. मृत विठ्ठलराव पोले हे औंढा  तालुक्यातील दुधाळा येथील रहिवासी होते. पण मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात नापिकी होती. अतिवृष्टीमुळे त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. हेही वाचा-..अन् चिमुकल्या बहीण-भावाचं हरपलं विश्व; शेतकरी दाम्पत्याने केला हृदयद्रावक शेवट अशात बोळवणीसाठी मुलींना कपडे घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. याच विवंचनेतून त्यांनी घरात ठेवलेलं कापूस फवारणीचं औषध प्राशन केलं. पोले यांनी विष प्राशन केल्याची माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान रात्री दीडच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित घटना 8 ऑक्टोबर रोजी घडली आहे. हेही वाचा-मुलं नातेवाईकांकडे जाताच साधला डाव; मुंबईत तरुणानं बायकोला दिला भयंकर मृत्यू पण रतनबाई विठ्ठलराव पोले यांच्या फिर्यादीवरून 2 डिसेंबर रोजी या घटनेची औंढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
First published:

Tags: Suicide

पुढील बातम्या