मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

8 महिन्यांपासून वेतन थकवलं; निलंग्यात नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

8 महिन्यांपासून वेतन थकवलं; निलंग्यात नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

Suicide in Nilanga: मागील आठ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने (salary arrears for 8 months) निलंगा नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगाराने नगर परिषदेच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

लातूर, 09 जून: कोरोना साथीच्या संकटकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबतचं सफाई कामगारांनीही (cleaning worker) आपल्या जीवाची पर्वा न करताना आपली सेवा बजावली आहे. तुटपुंजा पगार असूनही त्यांनी शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. असं असूनही नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे एका कंत्राटी सफाई कामगाराला आत्महत्या (Suicide) करावी लागली आहे. मागील आठ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने (salary arrears for 8 months) निलंगा नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगाराने नगर परिषदेच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

संबंधित आत्महत्या केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं नाव बाबुराव नामदेव गायकवाड आहे. मृत गायकवाड यांना मागील आठ महिन्यांपासून पगार दिला नव्हता. एककीडे कोरोनाचा प्रकोप सुरू असताना, आठ महिन्यांपासून पगार थकवून ठेवल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. गायकवाड यांना निलंगा नगरपरिषद आवारातील एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत बाबुराव गायकवाड मागील 35 वर्षापासून निलंगा नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. निलंगा नगरपरिषदेत सध्या 36 सफाई कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत, तर 70 कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपात काम करत आहेत. या 70 कंत्राटी कामगारांचे नियंत्रण एका खासगी एजन्सीला देण्यात आलं आहे. निलंगा नगरपरिषदेनं संबंधित एजन्सीला सर्व बिले अदा केली आहेत. असं असतानाही एजन्सीने मागील काही महिन्यांपासून कामगारांचं वेतन थकवलं आहे.

हे ही वाचा-दोन मैत्रिणींचे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह, ठाणे जिल्ह्यातील घटना

आज सकाळी गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अनेक कामगारांनी नगर परिषदेच्या आवारात एकत्र येत ठिय्या आंदोलनं केलं आहे. त्याचबरोबर जोपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली काढू देणार नाही, अशी भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केलं आहे.

First published:

Tags: Crime news, Latur, Suicide