मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्योजक नव्हे 'हे' आहे शेतकरी, शेतातून कमावले तब्बल 1 कोटी 20 लाख!

उद्योजक नव्हे 'हे' आहे शेतकरी, शेतातून कमावले तब्बल 1 कोटी 20 लाख!


एक एकर शेती असलेल्या शेतकऱ्याची आज ७० एकर शेती आहे, त्यांनी कधीही शासनाची कर्ज माफी घेतलेली नाही

एक एकर शेती असलेल्या शेतकऱ्याची आज ७० एकर शेती आहे, त्यांनी कधीही शासनाची कर्ज माफी घेतलेली नाही

एक एकर शेती असलेल्या शेतकऱ्याची आज ७० एकर शेती आहे, त्यांनी कधीही शासनाची कर्ज माफी घेतलेली नाही

  • Published by:  sachin Salve

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 28 फेब्रुवारी : श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव लडकत यांनी त्यांच्याकडील १४ एकर द्राक्षबागेतून तब्बल १ कोटी २० लाखांचे उत्पन्न मिळविलं आहे. त्यामुळे लडकत यांचा द्राक्ष शेतीचा प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरत असून इतर राज्यातही त्यांचे द्राक्षे जात आहे.

लडकत हे पारंपरिक शेतीचा व्यवसाय करताय १९७१ साली १ एकर जमीन होती. त्यानंतर त्यांनी आणखी १ एकर जमीन घेतली आणि त्यावर २०१० पासून द्राक्षाची लागवड केली. हळूहळू अनुभवातून लडकत यांनी द्राक्ष बागेचं क्षेत्र वाढवलं. सध्या त्यांच्याकडे १४ एकर द्राक्ष क्षेत्र आहे. ज्ञानदेव लडकत यांच्या प्रेरणेतून त्यांची दोन्ही मुलेही आज शेती करताय. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागतं. त्यानुसार, औषधांची फवारणी करून नियोजन करावं लागतं, असं लडकत  यांनी सांगितलं.

लडकत कुटुंब यांनी स्वत:चे प्रयोग करीत आहेत.  त्यांनी १४ एकर द्राक्ष बागेच्या छाटणीचे केलेलं नियोजन साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत १० ते १५ दिवसाच्या अंतराने छाटणी केली. ज्या १४ एकर द्राक्ष बागेतून त्यांना वर्षाला १ कोटी २० लाख रूपये मिळविलं. त्या बागेची छाटणी नोव्हेंबरच्या शेवटी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. याची विक्री त्यांनी पुणे नागपूर जमू काश्मीर, मध्यप्रदेश कोलकाता आणि इतर राज्यातील  व्यापाऱ्यास प्रतिकिलो ४० रूपये दरानं केली.

शेणखता बरोबरच जनावरांचे मलमूत्र एका हौदात साठवून ते द्राक्ष बागेस वेळोवेळी दिलं जातं. द्राक्ष बागेचा १४ एकराला ३५ लाखापर्यंत खर्च येतो. खर्च वजा करून १४ एकर मधून निव्वळ नफा १ कोटी २० लाख रूपये मिळाला. उर्वरित द्राक्ष बागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे.

'दोनही मुलं करतात शेती'

जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून त्यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिकर शेतीला फाटा देत पाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसंच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने लडकत यांना चांगला फायदा झाला आहे. लडकत यांना द्राक्ष शेतीसाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली आहे. आज त्यांची दोन मुले शेती करतात.

आज ग्रामीण भागाती मुली शहरी भागातील नोकरीवाला मुलगा पाहिजे, अशी आई-वडील आणि मुलींची इच्छा असते.मात्र, या कुटुंबातील महिला मात्र शेतकरीच नवरा केला पाहिजे आणि आज त्यांना शेतकऱ्याची पत्नी असल्याचा त्यांना आभिमान आहे.

'शासनाची कर्जमाफीही घेतली नाही'

एक एकर शेती असलेल्या शेतकऱ्याची आज ७० एकर शेती आहे, त्यांनी कधीही शासनाची कर्ज माफी घेतलेली नाही. बँकेतून कर्ज घेतले आणि वेळेत सुद्धा फेडले. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करताय कारण तेथील परिस्थिती वेगळी आहे. १ एकरासाठी कर्ज १० एकराचे घायचे मग ते फिटणार कसं, शेतीचं नियोजन केल्यास आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार नाही, असं मतही लडकत यांनी व्यक्त केलं.

First published:

Tags: Ahamadnagar, Farmer