भाजपचे 12 आमदार पक्ष सोडणार? गिरीश महाजनांनी केला खुलासा!

भाजपचे 12 आमदार पक्ष सोडणार? गिरीश महाजनांनी केला खुलासा!

महाविकास आघाडीचं सरकार हे टिकणारं नसल्याने कोण तिकडे जाणार, महाविकास आघाडीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 05 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यांतर महाविकास आघाडीचे नेते भाजपवर डाव उलटविण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांचं इनकमिंग झालं होतं. त्याला मेगाभरती असं नाव देऊन भाजपने अनेक नेते ओढून घेतले होते. नेत्यांचं हे इनकमिंग राज्यात प्रचंड गाजलं होतं. मात्र निकालानंतर सगळीच परिस्थिती पलटली. भाजप आता सत्तेबाहेर असल्याने भाजपमध्ये असंतुष्ट आणि काठावरचे आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. एकूण 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. भाजपचे संकटमोचक आणि मेगाभरतीचे सूत्रधार म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांनी यावर मोठा खुलासा केलाय. गिरीश महाजन म्हणाले, भाजपचा कुणीही आमदार पक्ष सोडणार नाही. या केवळ अफवा आहेत. भाजपचे किंवा भाजपमध्ये आलेले आणि भाजपसोबत असलेले अपक्ष आमदार यापैकी कुणीही पक्ष सोडणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे टिकणारं नसल्याने कोण तिकडे जाणार असंही ते म्हणाले.

आता भाजपमध्ये आऊट गोईंग, हा मोठा नेता आहे शिवसेनेच्या रडावर

तर महाजन अडचणीत येणार

सत्ता जाताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाजन हे जलसंपदामंत्री असताना सरकारच्या शेवटच्या काळात जे जलसिंचन प्रकल्प मंजूर झाले त्यांचा नवं सरकार आढावा घेण्याची शक्यता आहे. हे सर्व चार प्रकल्प जळगाव जिल्ह्यातले आहेत. त्यासाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र हा निर्णय घेताना नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही अशी माहिती दिली जातेय. उद्धव ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला गिरीश महाजन यांनी आव्हान दिलंय.गिरीश महाजन म्हणाले, सिंचन प्रकल्पांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकारने हवी ती चौकशी करावी मात्र कामं थांबवू नयेत असंही त्यांनी सांगितलं.

'राष्ट्रवादीशी युती कधीच होऊ शकत नाही'; नेत्याचे थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान

सत्तेत आल्यानंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केलीय. कुठलेही प्रकल्प थांबविण्यात येणार नाहीत मात्र अनावश्यक खर्च थांबविणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय. तर सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन अग्रक्रम ठरविण्यात येणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. या प्रकल्पांसाठी नुसताच 5 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावांना अर्थमंत्रालयाची परवानगीच नव्हती असंही म्हटलं जातंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 5, 2019, 9:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading