एक नाही तब्बल 44 दुचाकी केल्या जप्त, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

एक नाही तब्बल 44 दुचाकी केल्या जप्त, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

या प्रकरणी 2 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 04 मार्च : उस्मानाबाद पोलिसांनी आज एका दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून तब्बल 44 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी 2 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

उस्मानाबाद पोलिसांनी  दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आरोपींकडून 44 दुचाकी जप्त करीत 2 गुन्हेगारांना अटक देखील केली आहे.  हे अट्टल गुन्हेगार पुणे आणि सोलापूर या मोठ्या शहरात दुचाकी चोरत होते. दुचाकी चोरल्यानंतर  गाडीचे चेसी, इंजिन आणि नंबर बदलून गाडी विक्री करण्याचे काम हे आरोपी करत होते.

एवढंच नाहीतर या चोरांनी सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही फसवलं असल्याची बाब समोर आली आहे.

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला या टोळीची खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि या चोरांवर पाळत ठेवली. अखेर या टोळीला रंगेहाथ पकडलं.

त्यानंतर तीन दिवसांच्या तपासातून या टोळीकडून 44 गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत. या 44 गाड्याची किंमत 14 लाख 56 हजार रुपये एवढी आहे.  शंकर देवकुळे आणि विठ्ठल मगर असं या आरोपींची नाव आहे. या दोघांसोबत आणखी कोण कोण आहे याचा पोलीस तपास करत आहे.

तसंच, चोरण्यात आलेल्या  या दुचाकी कुणाच्या चोरल्या किंवा आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास करत असल्याची माहिती उस्मानाबाद पोलीस निरीक्षक राजतीलक रोशन यांनी दिली आहे.

शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा सापडला बेवारस मृतदेह

दरम्यान, किल्ले शिवनेरीवर पुन्हा एकदा बेवारस मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज दुपारी किल्ल्यावरील कडेलोटाच्या पश्चिमेच्या बाजूस एक बेवारस मृतदेह निदर्शनास आला, त्यानंतर हा मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अत्यंत जिकिरीचा असणाऱ्या या वाटेत हा मृतदेह काढताना वनरक्षक रमेश खरमाळे वनपाल शशिकांत मडके वनरक्षक नारायण राठोड किरण बाणखेले व विवेक पिंगळे यांना कसरत करावी लागली.

निसरडी वाट या वाटेतून मृतदेह काढत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. हा मृतदेह तीस ते 35 वर्षांच्या युवकांचा असून  चार ते पाच दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असावा असं सांगण्यात येत आहे.

शिवजयंती नंतर 4 दिवसांनी पाण्याच्या टाकीत एक मृतदेह सापडला होता. आज किल्यावर दुसरा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

First published: March 4, 2020, 10:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading