सिल्लोड, 5 फेब्रुवारी : गावात राजकारणी नेत्यांच्या मिरवणुका आपण नेहमी पाहत असतो. सिल्लोड तालुक्यातही अशीच एक अनोखी मिरवणूक काढण्यात आली. मात्र ही मिरवणूक कुणा राजकीय नेत्याची नाही तर देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या भूमीपूत्राची आहे. सिल्लोड तालूक्यातील आसडी येथील भूमीपुत्र प्रकाश पांडुरंग सोनवणे हे तब्बल 20 वर्ष देशाची सेवा करून 31 जानेवारी रोजी सेवा निवृत्त होऊन शुक्रवारी सायंकाळी गावी परतले.
यावेळी त्यांच्या स्वागतासाठी गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. गावाला जत्रेचं स्वरुप आलं होतं. ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात प्रकाश सोनवणे यांची मिरवणूक काढण्यात आली. ते बसमधून खाली उतरताच पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. युवकांनी फटाक्याची आतषबाजी केली.
गावात राजकारणी नेत्यांच्या मिरवणुका आपण नेहमी पाहत असतो. मात्र ही मिरवणूक देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सिल्लोड तालूक्यातील आसडी गावातील भूमीपूत्राची आहे. pic.twitter.com/mlHWf90gpr
— News18Lokmat (@News18lokmat) February 5, 2021
हे ही वाचा-VIDEO : देवाचा चमत्कार? असं काहीतरी घडलं की क्षणार्धात अपंग व्यक्तीही धावू लागला
आसडी गावातील प्रकाश सोनवणे यांनी परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यावर मात करून ते 2000 मध्ये सीमा सुरक्षा दलात BSF मध्ये भरती झाले. त्यांनी वीस वर्षे सेवा देशाच्या संरक्षणासाठी सेवा केली. आज ते निवृत्त झाले. ते सिल्लोड येथील बसस्थानक येथे येताच त्यांच्या मित्रमंडळीनी त्यांचं स्वागत केले. त्यांनतर प्रकाश सोनवणे आसडी नगरीत येताच गावकऱ्यांनी एका वाहनाला फुलांनी सजविलं होतं. प्रकाश सोनवणे त्यांच्या आई रुखमनबाई, वडील पांडुरंग सोनवणे यांना या गाडीत बसवून भव्य दिव्य स्वागत करीत गावकऱ्यांच्या वतीने देशभक्ती पर गीत वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रकाश सोनवणे यांच्या पत्नी व आईंनी त्यांचे औक्षण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad