मुंबई, 26 नोव्हेंबर: नैऋत्य मोसमी वारे भारतातून परत जाऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. असं असलं तरी सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून (Northeast Monsoon active) सक्रिय आहे. त्यामुळे पुढील एक आठवडा दक्षिण भारतात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची (heavy rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने नुकतंच पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार, पुढील किमान एक आठवडा महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी सासत्याने पाऊस कोसळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यातील ढगाळ हवामानामुळे पिंकावर किड पडण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे अस्मानी संकटाच्या भीतीने राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून अनेक द्राक्षे बागांवर किड पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Extended range forecast for rainfall in 4 weeks by IMD: Active NE monsoon condition likely ovr south in wk 1. Kerala,Tamil Nadu, SIK, S parts of Mah (Konkan), Western parts of MP,CAP will also be active during period. Wk 2:Mostly weak NE monsoon. Wk 3,4:NE monsoon likely normal. pic.twitter.com/G7R1QMQt3x
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 26, 2021
अशात पुढील आणखी काही दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे. त्यातही पुढील एक आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. आजपासून 2 डिसेंबर पर्यंत दक्षिण भारतात ईशान्स मान्सून सर्वात जास्त सक्रिय राहणार आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश या भागात पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात ईशान्य मान्सून सामान्य होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
हेही वाचा-धोक्याची घंटा, द.आफ्रिकेतल्या नव्या Variantनंतर भारत सरकार Alert; निर्देश जारी
हवामान खात्याने सोमवारी (29 नोव्हेंबर) आणि मंगळवारी (30 नोव्हेंबर) रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर मंगळवारी नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Weather forecast, महाराष्ट्र