Election Result: MIM ने औरंगाबाद गमावलं पण... या दोन जागांवर दिले सरप्राईज!

Election Result: MIM ने औरंगाबाद गमावलं पण... या दोन जागांवर दिले सरप्राईज!

उत्तर महाराष्ट्रात MIM ने जोरदार मुसंडी मारली आहे.

  • Share this:

धुळे,24 ऑक्टोबर: उत्तर महाराष्ट्रात MIM ने जोरदार मुसंडी मारली आहे. MIM चे उमेदवार डॉ. फारूक शाह हे धुळे शहरमधून तर मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल निवडून आले आहेत. मात्र, मागील निवडणुकीत मिळलेली औरंगाबाद आणि भायखळाची जागा MIM ने कायम राखता आली नाही. तसे पाहिले तर यंदाची निवडणूक एकतर्फी होईल, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी काट्याची लढत पाहायला मिळाली.

धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदान संघापैकी एकमेव धुळे ग्रामीण मतदार संघात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील विजयी झाले आहेत. तर धुळे शहरात एमआयएमने परिवर्तन घडवले आहे. डॉ. फारुख शहा यांनी विजश्री खेचून आणली आहे. शिंदखेड्यात पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावळ यांनी आपला गड शाबूत ठेवण्यात यशल आले आहे. शिरपूरमधून कांशीराम पावरा हे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

MIM ने औरंगाबाद गमावलं...

एमआयएमने 2014 च्या निवडणुकीत 24 जागा लढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट असताना 2 जागा (औरंगाबाद, भायखळा) जिंकल्या होत्या. या निवडणुकीत एमआयएमने काही ठिकाणी चांगलीच मुसंडी मारली होती. एमआयएमचे तीन (धुळे शहर, औरंगाबाद मध्य, मालेगाव मध्य) उमेदवार सुरूवातीपासून आघाडीवर होते. त्यापैकी एमआयएमला धुळे शहर आणि मालेगाव मध्य मध्ये यश मिळाले. याचा अर्थ असा की, एमआयएमने महाराष्ट्रात त्यांचा असा एक मतदारवर्ग असल्याचे सिद्ध केले आहे.

मनसेपेक्षा एमआयएमची कामगिरी सरस...

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये आपला खासदार निवडून आणला. बहुजन वंचित आघाडीमुळे हे शक्य झाल्याचे विश्लेषण करण्यात आले. परंतु त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मराठी माणूस केंद्रस्ठानी असणाऱ्या मनसेला मने जिंकण्यात सपशेल अपयश आले आहे.

धुळे जिल्ह्यातील विजयी उमेदवार...

धुळे शहर- फारुख शाह (एमआयएम)

धुळे ग्रामीण- कुणाल पाटील विजयी(काँग्रेस)

शिंदखेडा- जयकुमार रावळ(भाजप)

शिरपूर- कांशीराम पावरा(भाजप)

साक्री- मंजुळा गावीत(भाजप बंडखोर)

स्ट्रॉंगरूमबाहेर चक्क खाट टाकून या नेत्याने दिला होता पहारा...

ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा हेरफेर होऊ नये, यासाठी धुळ्याचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी बुधवारी स्ट्रॉंग रूम जवळ हजेरी लावली. व नंतर रात्री त्यांनी चक्क खाट टाकून ठिय्या देत रात्रभर पहारा दिला होता. मात्र, अनिल गोटे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनिल गोटे यांचा लोकसभा निवडणुकीतही दारुण पराभव झाला होता.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी पतका फडकावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती- 31,(भाजप-18, शिवसेना-13), महाआघाडीला-6 (काँग्रेस-5, राष्ट्रवादी-1) जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

Published by: Sandip Parolekar
First published: October 24, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading