Live Result: नाशकात भाजप पिछाडीवर, राष्ट्रवादी 'कमबॅक' करणार?

Live Result: नाशकात भाजप पिछाडीवर, राष्ट्रवादी 'कमबॅक' करणार?

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर तर भाजप शिवसेना पिछाडीवर दिसत आहे. येवल्यातून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ आघाडीवर आहे.

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,24 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर तर भाजप शिवसेना पिछाडीवर दिसत आहे. येवल्यातून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ आघाडीवर आहे. यासोबतच भुजबळांसह राष्ट्रवादीचे सहा उमेदवार आघाडीवर आहे. देवळालीमधून सरोज अहिरे, निफामधून दिलीप बनकर, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, कळवणमधून नितीन पवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, नाशिक नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, चांदवडमधून डॉ राहुल आहेर हे भाजपचे तर बागलाणमधून शिवसेनाचे उमेदवार दिलीप बोरसे, मालेगाव बाह्यमधून दादा भुसे, नांदगावमधून सुहास कांदे आघाडीवर आहेत. इगतपुरीतून हिरामण खोसकर तर मालेगाव मध्यमधून एमआएमचे मुफ्ती इस्माईल आघाडीवर आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

- राज्यात राष्ट्रवादीला चांगलं यश

- स्वबळावर भाजप सत्तेवर येईल अशी शक्यता नाही

- भाजपचा आत्मविश्वास असला तरी ते शक्य नाही

- आघाडीचा परफॉर्मन्स वाढला

- नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं कमबॅक

- 6 जागा राष्ट्रवादीला मिळतील

- काँग्रेसलाही 2 जागा मिळू शकतात

-भाजपच्या काही जागा आम्ही जिंकू

- दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल

- अबकी बार 200 पार या युतीच्या दाव्याला बळ नाही

- पवार साहेबांच्या सभांना मोठं यश

- सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी जिंकणार

- नाशिकमध्ये शिवसेनेला जागा राखण्यात अपयश

- नांदगाव मध्ये बदल होईल

- लोकं पाठीमागे असल्यानं आशीर्वाद दिलाय

- लोकांच्या नाराजीचा भाजपला फटका

- नवीन युवा चेहरे पुढे येताय

- सचिन अहिर सेनेत गेल्यानं आदित्य ठाकरे यांना फायदा

- पूर्ण निकाल लागल्यावर EVM बद्दल बोलेल

- शरद पवार यांच्या सभांचा मोठा परीणाम झाला

Nandurbar Result: उत्तर महाराष्ट्रात पहिला विजय, भाजपच्या विजयकुमारांनी मारली बाजी

मतमोजणीदरम्यान गोंधळ

नाशिकमध्ये मतमोजणीत गोंधळ झाला आहे. नाशिक पूर्वमध्ये काँग्रेस उमेदवार गणेश उन्हवणे यांनी टेबल क्र.8 वरील मशीन बदलल्याची तक्रार केली आहे. निवडणूक अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचेही गणेश उन्हवणे यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाआघाडीला धोबीपछाड देत महायुती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात भाजप आघाडीवर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछाडीवर दिसत आहे. भाजप 8, शिवसेना 8, काँग्रेस 10, राष्ट्रवादी 7 आणि अपक्ष 1 असे सुरूवातीचे चित्र आहे. येवल्यातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे संकटमोचन मंत्री अर्थात गिरीश महाजन हे जामनेरमधून आघाडीवर आहेत. तर धुळे शहर मतदार संघात अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे पोस्टल मतांमध्ये पुढे आहेत. नांदगांव विधानसभा शिवसेनेचे सुहास कांदे 4400 मतांनी आघाडीवर असून राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ पिछाडीवर आहे. मुक्ताईनगरात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खेवलकर- खडसे या पिछाडीवर आहे. नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे 2584 आघाडीवर आहेत. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे 1937 मतांनी हे आघाडीवर आहेत.

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 01:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading