ईशान्य मुंबई वाद, 'ती' शिवसेनेची अधिकृतच भूमिका : सुनिल राऊत

ईशान्य मुंबई वाद, 'ती' शिवसेनेची अधिकृतच भूमिका : सुनिल राऊत

शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी ठाम भूमिका घेत दिला संदेश

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतील उमेदवारीवरून राजकारण प्रचंड तापलंय. गुरुवारी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनिल राऊत, यांनी किरीट सोमय्या याच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आणि एकच खळबळ उडवून दिली होती.

दरम्यान, सुनिल राऊत यांनी जाहीर केलेली भूमिका, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केल्याचे संदेश काल माध्यम प्रतिनिधींना पाठवण्यात आले. मात्र, अशा प्रकारे गैरसमज निर्माण करणारे आणि शिवसेनेच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करणारे संदेश फिरवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर, शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनीच ठाम भूमिका घेत चपराक दिली आहे.

वाचा : ईशान्य मुंबईचा वाद: आम्ही देखील जशास तशी भूमिका घेऊ- भाजप कार्यकर्ते

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनीक आक्रमक भूमिका घेत असतील, तर त्यांची भूमीका अनधिकृत ठरवून किरीट सोमय्यांच्या बाजूने कोणी संदेश पाठवून पक्षाच्या भुमिकेबद्दलच गैरसमज निर्माण करत असतील. तर पक्षातील आणि बाहेरील विरोधकांचा शिवसेना स्टाईलने समाचार घेणारा संदेशच आमदार सुनिल राऊत यांनी प्रसिद्ध केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या नावाने चूकीचा संदेश पाठवणार्यांना एक प्रकारे ईशाराच शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी दिला आहे. एकूणच ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून आता शिवसेनेत अंतर्गत सुद्धा लढाई सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

VIDEO: युतीत ईशान्य 'मुंबई नाट्य' सुरूच; उमेदवारीबाबत सुनील राऊत म्हणाले..

First published: March 29, 2019, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading