पुणे, 01 मे: काल पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं (Non seasonal rainfall) हजेरी लावली आहे. अजूनही राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत. चालू आठवड्याच्या शेवटी शनिवारी आणि आणि रविवारी पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.
मात्र, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाने चाळीशी पार केली आहे. आज चंद्रपूर आणि वर्धा याठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून येथील तापमान 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं आहे. तर विदर्भातील किमान तापमान वाशिम जिल्ह्यात नोंदल गेलं असून याठिकाणी 18.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात करण्यात आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असता, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे.
Severe weather warnings by @RMC_Mumbai @RMC_Nagpur for coming days, possibility of TS🌩 in most parts of state with likely hailstorm at isol places on Saturday & Sunday in S Madhya Maharashtra & adjoining marathwada too. Watch nowcast issued by IMD. Mumbai today ☁☁ !! 😷Must pic.twitter.com/bwJ5nqPyIf
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 1, 2021
शनिवारी आणि रविवारी मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार आहे. याचा सर्वाधिक फटका अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद, लातूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यात वरुणराजा गरजणार आहे.
Thunderstorm accompanied with lightning, moderate to intense spell of rain, gusty winds very likely to occur at isolated places in the district of Nandurbar, Beed and Satara during next 3-4 hrs. Possibility of hail at isolated places. pic.twitter.com/tqy3HyXo9F
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 1, 2021
हे वाचा- Weather Update: राज्यात आणखी पाच दिवस मेघ गरजणार; मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता
त्याचबरोबर, येत्या तीन ते चार तासांत नंदुरबार, बीड आणि सातारा या जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नंदुरबार, बीड आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.