परतीच्या पावसामुळे बळीराजा रस्त्यावर, शेतकऱ्यांसाठी अमित शहांचं आश्वासन

राज्यात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जर सरकारने तात्काळ पाऊल उचललं नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 08:20 AM IST

परतीच्या पावसामुळे बळीराजा रस्त्यावर, शेतकऱ्यांसाठी अमित शहांचं आश्वासन

मुंबई, 01 नोव्हेंबर : यंदा संपूर्ण देशात पावसाने थैमान घातलं. तर आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुरतं हैरान केलं आहे. यंदाच्या परतीच्या पावसामुळे तब्बल लाखो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळ निघालं असंच म्हणावं लागेल. परतीच्या पावसामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं. अनेक फळबागा, काढणीला आलेलं पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, अवकाळी पाउस, वादळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीकहानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठवणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलं आहे. राज्यपालांनी गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांना फोन करून राज्यात अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकहानीबद्दल अवगत केलं. त्यावेळी शाह यांनी राज्यपालांना उपरोक्त आश्वासन दिलं आहे. त्यामुळे या पथकाचा आता शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राज्यात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जर सरकारने तात्काळ पाऊल उचललं नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दिला आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून जनतेला मूर्ख बनवण्याचं काम शिवसेना भाजप महायुती करतेय अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे एकीकडे पावसाचा धुमाकूळ तर पावसामुळे राजकीय वातावरण तापलेलं राज्यात पाहायला मिळतं.

दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने पाऊसामुळे लोकांचे हाल झाले असून दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. अवेळी होत असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडल्याची घटना काही ठिकाणी घडल्या आहेत.

पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने कऱ्हा नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे नाझरे धरण चौथ्यांदा ओवरफ्लो झालं आहे. नदीतून धरणात 4000 क्यूसेक्स वेगाने पाण्याची आवक झाली.

Loading...

हिंगोली जिल्ह्यात या वर्षी मान्सूनोत्तर पाऊस पडतोय. मागील 10 दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. सोयाबीनला जागीच पावसामुळे कोंब फुटले आहे तर जे सोयाबीन कापण्यात आले होते ते पाण्यामुळे सोडून गेलं. कापूस, ज्वारीसह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान या पावसामुळे झाले आहे.

क्यार चक्रीवादळ आणि सततचा पाउस यामुळे कोकणातल्या भातशेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. पंचनाम्यांसाठी आम्ही आणखी किती दिवस वाट पाहायची ? असा सवाल शेतक-यांनी विचारला आहे. तोपर्यंत 10-20 टक्के भात जे मिळेल ते ही हातातल जाईल म्हणून सरकारने आम्हाला तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंधुदुर्गातल्या भात उत्पादक शेतकऱ्यानी केली.

इतर बातम्या - राजकारण ते पाऊस, आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 10 बातम्या

क्यार चक्रीवादळ आणि होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका कोककणातील मच्छीमार बांधवांना बसला. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कोकणातील मच्छीमारी ठप्प झाली. समुद्र खवळल्यामुळे मासेमारीसाठी प्रतिकुल परिस्थिती नाही. त्यामुळे आणखी 3 ते 4 दिवस मासेमारी बंद राहण्याची चिन्ह आहेत.

परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने याचा मोठा परिणाम द्राक्ष शेतीवर झालेला पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून द्राक्ष पट्टयात सतत मोठा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष फुलोऱ्यातील द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे आहे. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान पुणे शहर तसेच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, 2 नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. ग्लोबल वॉर्मिंग तसेच उशीराने झालेलं मान्सूनचे आगमनाचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यातही पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाजही अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्याला मान्सूनोत्तर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसाने पुणेकरांसह शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. शेतातील पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत हाताशी आलेला घासही या पावसाने हिरावल्याने शेतकरी हताश झाला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे 'ढग' गोळा झाले आहेत.

वादळी वारा, गारपीठीसह जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यातल्या शिरुर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात बुधवारी (30 ऑक्टोबर) वादळी वारा, गारपीठीसह जोरदार पाऊस झाला. जुन्नरमधील ओतूर रोहोकडी येथे मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. झालेल्या नुकसानाचे त्वरीत पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...