नोकरीत आरक्षणाने पदोन्नती घटनाबाह्य-सुप्रीम कोर्ट

नोकरीत आरक्षणाने पदोन्नती घटनाबाह्य-सुप्रीम कोर्ट

या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने हे आरक्षण घटनाबाह्य ठरवून सगळ्या बढत्या रद्द करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरूद्ध राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केली होती. आता सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे

  • Share this:

दिल्ली, 08 नोव्हेंबर: नोकरीत आरक्षणाने पदोन्नती देणे घटनाबाह्य आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता.

नोकरीच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने हे आरक्षण घटनाबाह्य ठरवून सगळ्या बढत्या रद्द करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरूद्ध राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केली होती. आता सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. 30 ऑक्टोम्बर 2017 ला उच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. आता राज्य सरकारवर दिलेल्या बढत्या मागे घेण्याची नामुष्की आली आहे. नुकतीच पाटबंधारे सचिवांना दिलेली बढती तात्काळ मागे घ्यावी लागली आहे

आता या निर्णयानंतर राज्य सरकार बढत्या मागे घेतं की आजून काही करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 8, 2017, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading