सप्तश्रुंगी मंदिरातील बोकड बळीची प्रथा बंद;पायथ्याशी दिला बळी

सप्तश्रुंगी मंदिरातील बोकड बळीची प्रथा बंद;पायथ्याशी दिला बळी

गील वर्षी मंदिर आवारात बोकड बळी देण्याच्या वेळी बंदुकीच्या छऱ्यांने बारा जण जखमी झाले होते. यानंतर सुरक्षेचं कारण देत मंदिरात बोकड बळीची प्रथा बंद करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. सुरूवातीला गावकऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नव्हता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गावकऱ्यांनी आज बोकड बळी मंदिरात न करता पायथ्याशी दिला.

  • Share this:

वणी,30 सप्टेंबर: सप्तश्रुंगी गडावरील मंदिरातली बोकड बळीची प्रथा बंद झालीय. यावर्षीपासून गावकऱ्यांनी मंदिराच्या पायथ्याशी बोकडाचा बळी दिला.

मागील वर्षी मंदिर आवारात बोकड बळी देण्याच्या वेळी बंदुकीच्या छऱ्यांने बारा जण जखमी झाले होते. यानंतर सुरक्षेचं कारण देत मंदिरात बोकड बळीची प्रथा बंद करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. सुरूवातीला गावकऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नव्हता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गावकऱ्यांनी आज बोकड बळी मंदिरात न करता पायथ्याशी दिला. यावेळी गड परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी दिला जातो अशी परंपरा आहे. या वर्षी बोकड बळीचा मान मनोज वाघ यांनां मिळाला. आज गावकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गडाच्या पहिल्या पायरीवर बोकड्याची पूजा करून नंतर पायथ्याशी बोकड्याचा बळी दिला गेला.

First published: September 30, 2017, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading