लक्ष्मण घाटोळ, नाशिक 27 मे : सुरत येथील दुर्घटनेनंतर न्यूज 18 लोकमतने नाशिकमधील काही खाजगी क्लासेस मधील फायर सेफ्टी यंत्रणांची पाहणी केली त्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलंय. नाशिकमधल्या 90 टक्याहुन अधिक क्लासेस मध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याचं धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आलंय. ही परिस्थिती मुंबई पुण्यासह अन्य राज्यातल्या इतर शहरांमध्येही असण्याची शक्यता आहे.
सुरत येथे झालेल्या कोचिंग क्लासेस दुर्घटनेत अनेक निष्पाप मुलांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातू
हळहळही व्यक्त करण्यात आली. मात्र या ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा असती तर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे जीव वाचले असते ही बाबही समोर आली. महाराष्ट्रात तर आता तालुका स्तरावरही कोचिंग क्लासेसचा पूर आलाय. कॉलेजमध्ये जाणारी बहुतांश मुले कॉलेजमध्ये कमी आणि क्लासेसमध्ये जास्त वेळ घालवत असतात.
असं असतानाही या खसागी क्लासेसमध्ये कुठलेही सुरक्षेचे उपाय केले जात नाहीत. लाखो रुपये फी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते मात्र त्या प्रमाणात सुविधा दिल्यात जात नाहीत. नाशिक मधील खाजगी क्लास चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं वास्तव समोर आलय. नाशिक शहरातील अशोक स्तंभ, गोळे कॉलनी परिसरात 100 पेक्षा जास्त क्लासेस आहे.मात्र यातील 90 टक्याहून अधिक क्लासेस मध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणाच नसल्याच दिसून आलंय.
खासगी क्लासेसमध्ये फायर सेफ्टी नसल्याची बाबा जेव्हा महापालिका आयुक्तांना लक्षात आणून दिली गेली त्यानंतर त्यांनी सर्व क्लासेसची पाहणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या क्लासेस चालकांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे.