कर्जमाफीत आम्ही नाही, तुम्हीच गोंधळ घातलाय;देशमुखांनी फोडलं मीडियावर खापर

कर्जमाफीत आम्ही नाही, तुम्हीच गोंधळ घातलाय;देशमुखांनी फोडलं मीडियावर खापर

यात 2008 ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून काम सुरू आहे. थोडासा वेळ लागतोय पण पारदर्शकता येण्यासाठी थोडा वेळ लागणार,असं ते म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 31 आॅक्टोबर : कर्जमाफीत काहीही गोंधळ झालेला नाही, आपणच गोंधळ करतोय असं धक्कादायक विधान सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय.एकाप्रकारे देशमुख यांनी आपल्या अपयशाचं खापर मीडियावर फोडण्याची धन्यता मानलीये.

देशमुखसाहेब गोंधळ आम्ही नाही गोंधळ तुम्ही घातलाय. ज्या शेतकरी कर्जमाफीकडे शेतकरी डोळे लावून बसलाय त्याची तुम्ही चेष्टा केलीये. कर्जमाफीसाठी सरकार तयार नसतानाही तुम्ही दिवाळीत कर्जमाफी देण्याचा हट्टहास केलात. कर्जमाफीचा घोळ समोर आला तेव्हा तुम्ही त्याचं खापरही माध्यमांवर फोडलं

श्रेय लाटण्यासाठी कुरघोडी करण्याच्या नादात तुम्ही उघडे पडलात. नव्हे तुमच्यामुळे सरकारमधील मंत्र्यांना जनतेत जाण्यासाठी तोंड राहिलेलं नाही. 18 जानेवारीला 8 40 हजारांची यादी सांगितली. आज ती फक्त एक लाखावर आलीये.

अपयश नाकारण्यासाठी कुणाच्याही डोक्यावर खापर फोडण्यासाठी ताकद वाया घालवण्यापेक्षा झालेली चूक निस्तरण्यासाठी वेळ द्या म्हणजे मिळवली.

2008 ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून काम सुरू आहे. थोडासा वेळ लागतोय पण पारदर्शकता येण्यासाठी थोडा वेळ लागणार,असंही देशमुख म्हणाले. तसंच 76 लाख खातेदार तपासायचे आहेत. जवळपास एक लाख एक हजाराची ग्रीन लिस्टची यादी तयार झालेली आहे. 671 कोटी ICICI बँकेतून त्या त्या बँकेला वाटप झालेलं आहे. संबंधित बँकांनी आता तपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले पाहिजे.

 

 

First published: October 31, 2017, 3:19 PM IST

ताज्या बातम्या