महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, 'या' जिल्ह्यात दिवसभरात एकही कोरोनामुळे मृत्यू नाही!

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, 'या' जिल्ह्यात दिवसभरात एकही कोरोनामुळे मृत्यू नाही!

नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. गेल्या सात महिन्यात एकट्या नाशिकमध्ये 1 हजार 670 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नाशिक, 02 नोव्हेंबर : गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाशी (Corona Virus) सामना करणाऱ्या महाराष्ट्राला (Maharashtra) आता दिलासा मिळाला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी एकाही रुग्णाचा (Corona patient) कोरोनामुळे मृत्यू न झाल्याचे समोर आले आहे. गेल्या सात महिन्यातील ही पहिलीच घटना आहे.

नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. गेल्या सात महिन्यात एकट्या नाशिकमध्ये 1 हजार 670 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, आता नाशकात कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच संपूर्ण जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड

तब्बल 7 महिन्यांनंतर कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला नसला तरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कायम आहे.  शहरासह जिल्ह्यात 1 नोव्हेंबर रोजी 244 नवीन कोरोना रुग्ण दाखल झाले आहे.

राज्यातही कोरोनातून बरे होण्याची संख्या वाढली

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  कोरोनाचा घसरता आलेख कायम ठेवण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. सलग गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या संख्येत घट होत आहे. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी 3 हजार 726 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 14 हजार 079 एवढी झाली आहे. तर Recovery Rate 89.92वर गेला आहे.

आता दिवाळीत प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, या बॅंकेने आणली '30 वर ट्रीट' योजना

दिवसभरात राज्यात 5 हजार 369 रुग्णांचं निदान झालं. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 83 हजार 775 एवढी झाली आहे. तर 113 जणांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या कमी होत आहे तर व्यवहार वाढत आहेत. लोकांमधलं गांभीर्य कमी होत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात स्वच्छ करणे, या त्रिसुत्रीवरच दुसरी लाट थोपवणं शक्य आहे, असं तज्ज्ञाचं मत आहे.

Published by: sachin Salve
First published: November 2, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या