Home /News /maharashtra /

602 नको रे बाबा! मंत्रालयातील एका दालनाबद्दलच्या अफवेमुळं मंत्र्यांना भीती

602 नको रे बाबा! मंत्रालयातील एका दालनाबद्दलच्या अफवेमुळं मंत्र्यांना भीती

मंत्रालयातील 602 नंबरच्या दालनात बसलेल्या तीन मंत्र्यांबाबत जे झालं त्यामुळे आता हे दालन घेण्यास मंत्री नकार देत असल्याची चर्चा रंगली आहे.

    मुंबई, 01 जानेवारी : राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी पार पडला. यानंतर आता मंत्र्यांचे खातेवाटप करणं बाकी राहिलं आहे. दरम्यान, सध्या मंत्रालयातील एका नको असलेल्या दालनाची चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्व मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं आहे. यामध्ये 602 नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे. 602 नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरला आहे. तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर असलेलं हे दालन अद्याप कोणाला देण्यात आलेलं नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यलयीन कर्मचाऱ्यासाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं. याआधीच्या भाजप सरकारमध्ये हे दालन एकनाथ खडसे यांना मिळाले होते. ते कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचं कामकाज बघायचे. पण खडसे यांना 2 वर्षातच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे कार्यालय दिलं गेलं. त्यांचा दोन वर्षांनी हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर हे दालन कोणालाही देण्यात आलं नाही. 2019 मध्ये भाजपचे अनिल बोंडे यांच्याकडे कृषीमंत्रीपद देण्यात आलं. तेव्हा हेच दालन बोंडेना दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेत बोंडेंचा पराभव झाला. यानंतर 602 नंबरच्या दालनाबाबतचा समज आणखी वेगाने पसरला. महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनीही याआधी 602 क्रमांकाच्या दालनात बसून काम केलं आहे. त्यांनीसुद्धा इथं काम करण्यास नकार दिला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दालनाबद्दलच्या अफवा फेटाळल्या आहेत. सर्व मंत्र्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार दालने दिली जात असून लवकरच हे दालनही एखाद्या मंत्र्याला दिलं जाईल असं प्रशासनाने म्हटलं आहे. एकेकाळी करावी लागली होती हमाली आणि स्लिप बॉय, आज दोघेही झाले मंत्री!

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या