Home /News /maharashtra /

'या सोनूवर कुणाचाच भरोसा नाय'; 13 जणांशी रचला लग्नाचा बनाव, घर लुटून झाली पसार

'या सोनूवर कुणाचाच भरोसा नाय'; 13 जणांशी रचला लग्नाचा बनाव, घर लुटून झाली पसार

पोलिसांनी सोनूला वेळीच पकडल्यामुळे भविष्यात तरुणांची लूट होण्यापासून रोखण्यात आलं आहे.

    नंदुरबार, 22 मे : खान्देशातून एका सोनू शिंदे नावाच्या तरुणीने आतापर्यंत तब्बल 13 तरुणांना फसवलं असून त्यांच्याशी लग्नाचं नाटक केलं आणि त्यांचा खिसा रिकामी करून पळ काढला. या गुन्ह्यात सोनू एकटी नाही तर तिच्यासोबत एक टोळी सक्रीय आहे. अखेर या सोनूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोली आणि अकोला या भागात ही टोळी सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. यंदा नंदुरबारमधील एका कुटुंबाला सोनूने आपल्या जाळ्यात ओढळं होतं. या कामात औरंगाबाद येथील एका दलालाने मदत केल्याची बाब उघड झाली आहे. कशी केली फसवणूक सोनू शिंदे या तरुणीने दोन आठवड्यांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका तरुणीशी लग्न केलं. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. त्यानुसार वराच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. वधूपक्षाने लग्नासाठी वरपक्षाकडून काही लाखांची मागणीही केली होती. वरपक्षाकडून हे पैसेही देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर सोनूने नेहमीप्रमाणे धूम ठोकली. सोनू पळाल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही ही बाब गांभीर्याने घेत तपास सुरू केला. हे ही वाचा-दीरावर जडलं प्रेम; औरंगाबादेतील महिलेनं 2 लाखाची सुपारी देत पतीचा काढला काटा पोलिसांच्या तपासाला कसं मिळालं यश? त्यादरम्यान पोलिसांना सोनू शिंदे नावाची तरुणी शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी 13 वं लग्न करणार असल्याची बातमी मिळाली. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यामुळे त्यांनी लग्नाचं ठिकाण बदललं. पोलिसांनी वेळेवर जाऊन लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला अटक केली. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सोनूला वेळीच पकडल्यामुळे भविष्यात तरुणांची लूट होण्यापासून रोखण्यात आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage

    पुढील बातम्या