मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'घर की मुर्गी दाल बराबर, आम्हाला कुणी विचारत नाही' सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा अहेर

'घर की मुर्गी दाल बराबर, आम्हाला कुणी विचारत नाही' सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा अहेर

'राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय'

पंढरपूर, 09 जानेवारी :  'माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय' असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील (shiv sena mla shahaji bapu patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे.  राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार पाटील यांनी देखील आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली.  पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

(CNG Price Hike : मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, काय आहेत नवे दर?)

'हॉस्पिटलचे काम चांगले झाले आहे. माढा मतदारसंघातून आपला एकही मंत्री नाही. माझं सोडं, मी पहिल्यांदाच आमदार झालो आहे. पण शिवसेनेतल्या कुणालाही घेतलं नाही. बबनदादा सारखे ३० वर्ष निवडून आले त्यांनाही संधी नाही. त्यामुळे आम्हाला कुणी काय विचारेल माहिती नाही. घर की कोंबडी दाळ बरा बर होऊन बसलंय, आमचा कुणी विचार करायला तयार नाही, गप्प बसा जा गावाकडे, असं म्हणत पाटील यांनी आपली मनातली खदखद बोलून दाखवली.

तसंच, 'मी पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार म्हणूननिवडून आलो. त्यामुळे मला पहिल्यांदाच लांब राह्याला सांगितलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही या सरकामध्ये आमचं कोणी एकेल. आमचा कोण विचार करेल असंही आता वाटत नाही. असं म्हणत, पाटील यांनी आपल्या सरकारला घरचा अहेर दिला आहे.

(जंगलात अनवाणी धावला होता Jr NTR, जाणून घ्या ‘RRR’चित्रपटाची Inside)

यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आमदार पाटील यांचे भाजप नेत्यांशी इतर नेत्यापेक्षा चांगले सख्य आहे.

First published: