• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • चक्रीवादळानं आलेलं डोळ्यातलं पाणी अजूनही गेलं नाही, या लोकांना नेमकं कोण मदत करणार?

चक्रीवादळानं आलेलं डोळ्यातलं पाणी अजूनही गेलं नाही, या लोकांना नेमकं कोण मदत करणार?

निसर्ग चक्रीवादळाला येऊन आता एक महिना होत आहे. मात्र, एक महिन्यानंतरसुद्धा निसर्ग चक्रीवादळातून लोक सावरले नाहीत तर दुसरीकडे लोकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:
रत्नागिरी, 03 जुलै : कोकण किनारपट्टीला 3 जून रोजी धडकलेले निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या इतिहासातील काळे पान आजही लोकांच्या मनाचा थरकाप उडवीत आहे. सुमारे शंभर वर्षानंतर या किनारपट्टीवर अशा स्वरूपाचे महाभयंकर चक्री वादळ येऊन धडकले आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या या कोकण किनारपट्टीची चांगलीच धूळधाण केली. या निसर्ग चक्रीवादळाला येऊन आता एक महिना होत आहे. मात्र, एक महिन्यानंतरसुद्धा निसर्ग चक्रीवादळातून लोक सावरले नाहीत तर दुसरीकडे लोकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याचं समोर आलं आहे. निसर्ग चक्री वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड या दोन तालुक्यात मोठी हाणी केली आहे. या चक्रीवादळात 40 हजार कुटुंब बाधित झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुमारे 75 गावांना या निसर्ग चक्री वादळाचा जबरदस्त तडाखा बसला तर मंडणगड तालुक्यातील 25 गावांना याचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. यामध्ये समुद्र किनारपट्टीवरील अनेक गावांत होत्याचं नव्हतं झालं. पहिल्या मुसळधार पावसाताच मुंबई पाण्यात, पाहा प्रत्येक ठिकाणचे PHOTOS पोटच्या पोराप्रमाणे संभाळलेल्या आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बाग डोळ्यासमोर जमीनदोस्त झाल्या. उदरनिर्वाहचं साधन असलेल्या या बागा उध्वस्त झाल्याने बागायदारांचा आधार नष्ठ झाला आहे. दापोली मंडणगड तालुक्यातील 5 हजार हेक्टरवरील 5 लाख फळझाडांचं नुकसान झालं आहे. निसर्ग चक्रीवादळाने दापोली तालुक्यातील 177 गावांचे नुकसान केलं आहे. मात्र, यामध्ये सुमारे 75 गावांमध्ये या वादळाने जबरदस्त तडाखा दिला आहे. मंडणगड तालुक्यातील 90 गावातील 25 गावांना मोठा फटका बसला आहे. या गावातील बागायती लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे दापोली तालुक्‍यातील सुमारे 25 हजार घरांची या निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालं आहे तर मंडणगड तालुक्यातील 15 हजार घरांचे नुकसान झालं. परंतु सरकारकडून अजूनही कित्येक लोकांना मदत मिळाली नाही त्यामुळे मदतीकडे डोळे लावून बसलेल्या लोकांच्या पदरी निराशा शिवाय काहीही पडले नाही. कोरोनाच्या संकटात भारतात Googleवर वेगळाच मुद्दा झाला सर्च, जूनमध्ये ट्रेंड बदलला BREAKING : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर सुरू, हे रस्ते केले बंद या दुर्दैवी घटनेला आज 3 जुलै रोजी एक महिना होत आहे. आजही कित्येक लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. काही लोकांच्या पदरात नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी रक्कम पडली आहे तर अजूनही कित्येक लोक सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे. कोरोनामुळे आधीच लोक मोठ्या संकटात आहेत तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने लोकांचं सगळं काही हिरावून घेतलं आहे. संपादन - रेणुका धायबर
First published: