मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'लोकांच्या मनातला मुख्यमंत्री शब्द कुणी खेचू शकत नाही', पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

'लोकांच्या मनातला मुख्यमंत्री शब्द कुणी खेचू शकत नाही', पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

कोअर कमिटी मीटिंगला ज्येष्ठ नेते आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या बैठकीला न जाण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली,

कोअर कमिटी मीटिंगला ज्येष्ठ नेते आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या बैठकीला न जाण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली,

कोअर कमिटी मीटिंगला ज्येष्ठ नेते आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या बैठकीला न जाण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली,

औरंगाबाद, 12 ऑक्टोबर :  'मी गेली दोन वर्ष इतके काम करतोय की मला जाणवले नाही की मी मुख्यमंत्री (Chief Minister) नाहीये' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendara fadanvis) यांनी पुन्हा एकदा आपली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पण, 'लोकांच्या मनातला मुख्यमंत्री हा शब्द कुणी खेचू शकत नाही' असं म्हणत भाजपच्या (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.

भाजपच्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज औरंगाबाद शहरात ओबीसी मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे कारण जनता मला तेवढं प्रेम देत आहे'. याबद्दल पत्रकारांनी पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्या म्हणाल्या की, 'ही चांगली गोष्ट आहे की, त्यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय. मात्र जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हा शब्द कुणी खेचू शकत नाही' असं म्हणत पंकजा मुंडेंनी यांनी फडणवीस सणसणीत टोला लगावला.

दोन वर्षांपूर्वी हरवली होती तरुणी, Google Maps वर अशी सापडली

तसंच, ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही मागण्या मान्य करून घेऊ, ओबीसी आरक्षणाचा इंपेरिकल डेटा केंद्राने नाही दिला तर राज्य शासन का अडकून पडतेय, राज्याच्या सरकरने त्यांची त्यांची भूमिका घ्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

तसंच, भाजपच्या कोअर कमिटी मीटिंगला मी जाऊ शकत नाही. कारण मी मराठवाड्याच्या भूमीतील आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आले, कोअर कमिटी मीटिंगला ज्येष्ठ नेते आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या बैठकीला न जाण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.

'ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे, तो अध्यादेश आरक्षणाला सुरक्षा देणारा पात्र असावा आणि कुणी कोर्टात गेलं तर सरकारने आपली भूमिका योग्य मांडावी आता वेळ आहे तर यात पूर्ण तयारी करून घ्यावी, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बिअरचा एक ग्लास देईल तुम्हाला मोठा त्रास, Beer पिण्यापूर्वी हे वाचाच

'ओबीसी, बहुजन लोक खचले आहे, त्या लोकांनी अर्धपोटी राहून आंदोलन केली त्यांना लक्षात ठेवायला हवे, दुर्दैवी चित्र एक दिसतंय, आम्ही कॉलेजमध्ये होतो तर मित्रांना मित्रांची जात माहिती नव्हती, मात्र आता लहान मुलांना सुद्धा जाती कळतात.  प्रीतम च्या मुलांला जाती कळतात, कदाचित अन्याय आंदोनलामुळे कळलं असावे मात्र हे चित्र बदलायला हवे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नवी मुंबईतील बेलापूर येथे मासळी विक्रेत्या महिलांना परवाना वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मंदा म्हात्रे, गणेश नाईक, नरेंद्र पाटील, रमेश पाटील तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाहीये. मला आजही मुख्यमंत्री असल्याचं वाटतंय. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेली 2 वर्षे एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाहीये. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा येथे गोवर्धनी मातेच्या दर्शनाला येणार'

First published: