मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे का? तुकाराम मुंढेंनी केलं हे आवाहन

मास्क, सॅनिटायझर वापरण्याची गरज आहे का? तुकाराम मुंढेंनी केलं हे आवाहन

 'साबणाने वारंवार हात धुवावे. हाताचा स्पर्श चेहरा, डोळ्यांना करू नये',

'साबणाने वारंवार हात धुवावे. हाताचा स्पर्श चेहरा, डोळ्यांना करू नये',

'साबणाने वारंवार हात धुवावे. हाताचा स्पर्श चेहरा, डोळ्यांना करू नये',

  • Published by:  sachin Salve
नागपूर, 17 मार्च :   'कोरोना व्हायरसच्या वाढता प्रकोप बघता नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. मास्कची गरज केवळ उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आहे', असं नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर सॅनिटायझरऐवजी साबणानेही 40 सेकंद शास्त्रोक्त पद्धतीने हात धुवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 'कोरोना'च्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना सतर्क राहण्याची सुचना केली आहे. 'दुबई, सौदी अरेबिया, यूएसए येथून येणारे पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. संशयितांनी घराबाहेर पडू नये म्हणून त्यांना 'निशान' लावण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची विक्षिप्त वागणूक करू नका आणि त्यांना त्रास देऊ नका, असं प्रकरण आढळून आल्यास संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल', असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. 'महापालिकेच्या नियंत्रण कक्षात आतापर्यंत 140 कॉल्स आले असून, नागरिकांचे समुपदेशन करण्यात आलं आहे. यावेळी, 'मास्क वापरण्याची गरज नसल्याचं नमूद करीत सॅनिटायझर विकत घेण्याच्या भानगडीत कुणी पडू नये', असंही मुंढे यांनी सांगितलं. 'साबणाने वारंवार हात धुवावे. हाताचा स्पर्श चेहरा, डोळ्यांना करू नये', असा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय नागरिकांनी भीती बाळगू नये, असं आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केलं. राज्यात पहिल्या रुग्णाचा 17 मृत्यू दरम्यान, महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र, आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती घाटकोपर स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या व्यक्तीला इतरही आजार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नाही मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यावर चर्चा सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पण पुढचे 7 दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं. नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे. लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरहून सुटणाऱ्या 23 एक्स्प्रेस रद्द दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नागपूरमधून सुटणाऱ्या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही शहरातून एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. 18 मार्चपासून ते 1 एप्रिल पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यानंतर 19 ते 31 तारखेपर्यंत पूर्णपणे या 23 गाड्या बंद राहणार आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या