Home /News /maharashtra /

तुळजाभवानी मंदिराच्या 11 पुजाऱ्यांवर कारवाई, बेशिस्त वर्तन केल्यामुळे प्रवेशबंदी; ही आहेत कारणं

तुळजाभवानी मंदिराच्या 11 पुजाऱ्यांवर कारवाई, बेशिस्त वर्तन केल्यामुळे प्रवेशबंदी; ही आहेत कारणं

मंदिरातील नियम तोडल्याप्रकरणी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील 11 पुजाऱ्यांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. या पुजाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसही बजावली आहे.

  तुळजापूर, 23 जानेवारी: बेशिस्त वर्तन केल्याचे (Breaking rules) सिद्ध झाल्यामुळे तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरातीतल (Tuljabhavai Temple) 11 पुजाऱ्यांवर (11 priest) कारवाई (Punishment) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या सर्व 11 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) घेतला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावरकर यांनी ही कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण? तुळजाभवानी मंदिरात 11 पुजाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचं सिद्ध झालं आहे. गाभाऱ्यात प्रवेशाला बंदी असतानाही प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे, बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षकांची हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसवणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन छोट्या मोठ्या लाभांसाठी नियम पायदळी तुडवणाऱ्या या पुजाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन तुळजाभवानी मंदिरात भाविकांप्रमाणेच पुजाऱ्यांसाठीदेखील काही नियम घालून देण्यात आले आहेत. मंदिरात गोंधळ उडू नये, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी आणि सर्वांना न्याय्य पद्धतीनं दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशानं हे नियम आखण्यात आले आहेत. कुठल्याही पुजाऱ्याला मंदिरात काम करण्यापूर्वी या नियमांची कल्पना देण्यात आलेली असते् आणि त्या नियमांचं पालन पुजाऱ्यांनी करणं गरजेचं असतं. मात्र काही पुजाऱ्यांनी या नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा- युद्धाचे ढग! अमेरिकेनं युक्रेनमध्ये पाठवला मोठा शस्त्रसाठा, रशियाला इशारा पुजाऱ्यांमध्ये खळबळ जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रवेशबंदीची कारवाई केल्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यात एकाचवेळी 11 पुजाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या 11 पुजाऱ्यांपैकी प्रत्येकावर कमीत कमी 1 महिना ते जास्तीत जास्त 3 महिन्यांसाठीची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेऊन ही कारवाई आहे. या कारवाईसोबतच प्रत्येक पुजाऱ्याला एक नोटिसही पाठवण्यात आली आहे. आपल्यावर सहा महिने प्रवेशबंदीची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटिशीतून करण्यात आली आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:desk news
  First published:

  Tags: Crime, District collector, Rules, Solapur

  पुढील बातम्या