कोकणातल्या 'या' गावात 6 महिने वीज बिल आलंच नाही

कोकणातल्या 'या' गावात 6 महिने वीज बिल आलंच नाही

तर मीटरचं रीडिंग घेण्यासाठी महावितरणनं कंत्राटदार नेमलाय. या कंत्राटदाराचे कर्मचारी ६ महिन्यांपासून गावात फिरकलेच नाहीत. महावितरणच्या अधिकारी याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत.

  • Share this:

07 डिसेंबर:  लोकं  विजेचं बिल भरत नाहीत म्हणून महावितरण नियमित कारवाई करत असतं. पण कोकणात एक गाव आहे, तिथे ६ महिन्यांपासून एकाही घरात विजेचं बिलच येत नाहीये.

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातलं पुरे बुद्रूक गावातला हा प्रकार आहे. आणि हो, वीज बिल माफ वगैरे केलं नाहीये. तर मीटरचं रीडिंग घेण्यासाठी महावितरणनं कंत्राटदार नेमलाय. या कंत्राटदाराचे कर्मचारी ६ महिन्यांपासून गावात फिरकलेच नाहीत. महावितरणच्या अधिकारी याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत. गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदनं दिली, अधिकाऱ्यांना विनंती केली.  पण यंत्रणा ढिम्मच आहे. एकीकडे, राज्यात विजेचा तुटवडा आहे.   महावितरणकडे निधीची कमतरता असते. आणि दुसरीकडे, प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या गावात बिलच येत नाहीये.

या अधिकाऱ्यांवर कधी आणि किती गंभीर कारवाई होणार, हे आता महावितरणनं सांगावं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading