एटीएमची अघोषित बंदी, नागरिक संतप्त

एटीएमची अघोषित बंदी, नागरिक संतप्त

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अघोषित अशी एटीएम बंदी लागू झाल्याचं चित्रं आहे.

  • Share this:

12 एप्रिल : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अघोषित अशी एटीएम बंदी लागू झाल्याचं चित्रं आहे. कारण कुठलंही कारण न देता एटीएममध्ये पैशांचा खडखडाट आहे. जे एखाद दोन एटीएम सुरु आहेत तिथं इतर एटीएमची कार्ड स्वीकारलेच जात नाहीयत. त्यामुळे एटीएमसमोर लोकांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.

होम बँकेचं एटीएम शोधण्यासाठी दाही दिशा धुंडाळाव्या लागतायत. एटीएमची अशी स्थिती का झालीय याचं कुठलंच कारण बँकांकडून दिलं जात नाहीय. फक्त एटीएमच्याबाहेर नो कॅशचे बोर्ड तेवढे लागलेले दिसतायत.

नोटाबंदीचा काळही संपलाय. लागून आलेल्या सुट्ट्या झाल्या तरीही परिस्थितीत फरक पडत नसेल, तर एवढे एटीएम असण्याचा फायदा काय, असा संतप्त सवाल खातेदार विचारतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 07:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading