जीएसटी, नोटाबंदीमुळे दिवाळीच्या तोंडावर किराणं दुकानं पडली ओस

जीएसटी, नोटाबंदीमुळे दिवाळीच्या तोंडावर किराणं दुकानं पडली ओस

आता दिवाळी आलीय त्यामुळे इथे मोठी लगबग असायला हवी होती. मात्र ती लगबग तर सोडाच दिवाळीसाठी स्टॉक केलेला माल यंदा संपतो का नाही याची भीती आता व्यापाऱ्यांना वाटते आहे.

  • Share this:

07 ऑक्टोबर: जीएसटी आणि नोटाबंदीमुळे वाढलेल्या महागाईचा फटका आता व्यापाऱ्यांना बसायला लागलाय. ऐन दिवाळीच्या मौसमात किराणा मालाची दुकानं ओस पडली आहेत.

आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी म्हटलं की सर्व कुटूंब एकत्र येतात. गोडधोड पदार्थ करणे हे आलंच. आता आठवड्यावर दिवाळी आली आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली असायला हवी. पण यंदा तसं मात्र झालेलं दिसत नाही. वाढलेल्या महागाईच्या चटक्याने किराणा दुकानदारांवर तर ऐन दिवाळीत संक्रात आलीय. परभणीची बाजारपेठ ओसाड पडली आहे तर कुठे कुठे तुरळक एक दोन ग्राहक येत आहेत. ही बाजारपेठ तशी लाखोंची उलाढाल करणारी बाजारपेठ आहे.

आता दिवाळी आलीय त्यामुळे इथे मोठी लगबग असायला हवी होती. मात्र ती लगबग तर सोडाच दिवाळीसाठी स्टॉक केलेला माल यंदा संपतो का नाही याची भीती आता व्यापाऱ्यांना वाटते आहे. दुष्काळ त्यापाठोपाठ झालेली नोटबंदी, आणि त्यानंतर बसलेला जीएसटीचा फटका. यामुळे भाववाढ तर झालीच शिवाय जीएसटीचा गवगवा एवढा झालाय कि ग्राहक दुकानाची पायरी चढायला तयार नाही आहेत. जरी ग्राहक आला तर एखादी वस्तू जिथे १ किलो घ्यायचा तिथं अर्धा किलो घेत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

तर दुसरीकडे पुण्यातील मार्केटयार्ड या आशियातील सर्वात मोठी बजारपेठेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या डाळींचे दर निम्म्यावर आले आहेत. तर रवा, मैदा,साखरेचे भाव स्थिर असताना देखील बाजारपेठ मात्र सुनीसुनी आहे.

एकंदरच व्यापाऱ्यांना आणि ग्राहक दोघांनाही महागाईचा चांगलाच फटका बसल्याचा दिसतोय.

First Published: Oct 7, 2017 08:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading