कोल्हापूरमध्ये बससेवा ठप्प

कोल्हापूरमध्ये बससेवा ठप्प

बसचे चालक आणि वाहक यांनी बस सेवा देण्यास नकार दिला आहे. अजूनही काही भागात तणाव असल्यामुळे ही बससेवा सुरू झालेली नाही

  • Share this:

कोल्हापूर, 02 ऑक्टोबर: रविवारी रात्री मोहरमच्या मिरवणुकीत झालेल्या अपघातानंतर आज कोल्हापूर शहरातील बससेवा बंद आहे. आज कोल्हापूर शहरात बऱ्याच ठिकाणी तणावाचं वातावरण आहे.

कोल्हापूर शहरात काल रात्री मोहरमची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत केएमटी बस घुसली होती. त्यानंतर झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर 18 जण जखमी झाले होते. त्यानंतर संतप्त जमावाने अपघातग्रस्त बस आणि इतर बसेसचीही तोडफोड केली होती. त्यानंतर आज सकाळपासून कोल्हापूर शहरातील केएमटी बस सेवा पूर्णपणे ठप्प आहे. बसचे चालक आणि वाहक यांनी बस सेवा देण्यास नकार दिला आहे. अजूनही काही भागात तणाव असल्यामुळे ही बससेवा सुरू झालेली नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पहाटे सहा वाजल्यापासून केएमटीच्या सुरू होणाऱ्या सगळ्या बसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

या अपघातानंतर कोल्हापूर महापालिकेच्या समोरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

First published: October 2, 2017, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading