Home /News /maharashtra /

FACT CHECK दफनाला बंदी? कोरोनाग्रस्त मृताच्या शरीरापासून व्हायरसचा धोका आहे का?

FACT CHECK दफनाला बंदी? कोरोनाग्रस्त मृताच्या शरीरापासून व्हायरसचा धोका आहे का?

दफनविधीला मनाई करण्यात आल्याच्या बातमीत तथ्य आहे का? कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून संसर्गाचा धोका आहे का? News18 Lokmat ने केलेलं FACT CHECK

    मुंबई, 30 मार्च : मुंबईत महापालिका आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेत Coronavirus मुळे मृत झालेल्या व्यक्तींचा दफनविधी करण्यास मनाई केली असल्याची बातमी आली.  कुठल्याही धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू Covid-19 च्या संसर्गाने झाला तरी जास्तीत जास्त 5 लोकांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार व्हावेत. मृतदेहाला थेट स्पर्श करणं टाळावं आणि दफनविधीऐवजी मृतदेहाचं दहन करावं, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, या अर्थाची बातमी होती. पण यातल्या दफनविधीवरच्या निर्बंधांचा मुद्दा मागे घेण्यात आला आहे. दफनभूमी मोठी असेल तर पूर्ण काळजी घेत दफन करायला हरकत नाही. शिवाय मार्गदर्शक तत्त्वानुसार अंत्यविधी करण्यात यावेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दफनाला बंदी या बातमीबद्दल संभ्रम निर्माण झाला. मुंंबईतल्या बहुतेक दफनविधीच्या जागा लोकवस्तीच्या नजिक आहेत, गावाबाहेर नाहीत. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हे उपाय  योजले आहेत, असं मुंबई महापालिकेचं म्हणणं होतं. मृत व्यक्तीपासूनही संसर्गाचा धोका असल्याने अंत्यसंस्काराबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं.  जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतांनुसार हे आदेश देण्यात आले आहेत. खरंच मृतदेहामुळे कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका आहे का? याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आम्ही जाणून घेतलं. दफनविधी करताना संसर्गाचा धोका अधिक असतो. मृतदेहाचं दहन करावं, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)संकेत आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. न्यूज 18 लोकमतशी बोलताना Indian Medical Assiciationचे राज्यातले (IMA, Maharashtra) अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "कोरोना विषाणूच्या संसर्गाने आजार होऊन मृत्यू पावणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. मृतदेहामध्ये कोरोनाव्हायरस किती काळ राहतो याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. सॅनिटायझर वापरण्याआधी हे वाचा! अपघातानंतर डॉक्टरांनी दिला सल्ला आजमितीला रुग्ण मृत्यू पावल्यावर त्यापासून विषाणूंचा संसर्ग इतरांना होतो किंवा नाही, याबद्दल खात्रीपूर्वक माहिती नाही. त्यामुळे मृतदेहाचा अंत्यविधी करताना घ्यायची काळजी महत्वाची ठरते. यासाठी काही संकेत जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने प्रसिद्ध केले आहेत, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं. काय आहेत WHO चे संकेत? कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी काही आरोग्य संकेत जागतिक आरोग्य संघटननेनं घालून दिले आहेत. - मृतदेह इस्पितळातून पाठवताना स्वच्छ आणि निर्जंतुक कपड्यांमध्ये किंवा बॉडीबॅगमध्ये पूर्ण गुंडाळून पाठवावा. ही बॉडीबॅग कुठेही फाटलेली नसावी. त्यातून पाणी किंवा द्रव पदार्थ बाहेर जाणार नाही अशी असावी. कोरोना संसर्गाने मृत झालेल्या व्यक्तीच्या, नाकातोंडातून असे द्राव मरणोत्तर अवस्थेतही शरीराबाहेर येत राहण्याची शक्यता असते. - मृतदेहाला सजवणं, अंघोळ घालणं, त्याचं चुंबन घेणं, मिठी मारणं, त्यावर काही धार्मिक विधी करणं, त्याला स्पर्श करणं या गोष्टी प्रकर्षानं टाळाव्यात. मात्र देहाभोवती बसून धार्मिक पठण किंवा स्पर्श न करता मंत्रोच्चार केलेले चालतील. - दहनभूमीच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने शेवटचं दर्शन घेण्यासाठी बॉडीबॅगचे तोंड 5 मिनिटं उघडं ठेवता येईल. -  मृतदेहाचं शवविच्छेदन करू नये. जर अतिशय आवश्यक असेल तरच सर्वतोपरी प्रतिबंधक उपाय करून शवविच्छेदन करावं. - अंत्ययात्रेसाठी गर्दी होऊ देऊ नये. मृताच्या नातेवाईकांमध्ये हा आजार असण्याची शक्यता असतं. - मृतदेहामध्ये विषाणू किती काळ राहतो, याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या देहाचं दफन न करता दहन करावं असा संकेत आहे. - मृतदेहाला उचलणाऱ्या आणि त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणाऱ्या व्यक्तींनी दहनभूमीच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण बाह्यांचा, संपूर्ण शरीराला झाकणारा, विल्हेवाट लावण्याजोगा (डिस्पोझेबल) अंगरखा, मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत. अन्य बातम्या टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर, जपानला बसणार मोठा फटका! मुंबईत लॉकडाऊन अधिक कडक, अनेक भागांमध्ये SRPF च्या तुकड्या तैनात
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या