Home /News /maharashtra /

रुग्णवाहिका आलीच नाही, कोरोनाबाधित पोलिसाने रात्रभर ड्युटी केली अन् सकाळी...

रुग्णवाहिका आलीच नाही, कोरोनाबाधित पोलिसाने रात्रभर ड्युटी केली अन् सकाळी...

एकीकडे संशयित म्हणून स्वॅब घेतला असतानाही या पोलिसाची ड्युटी लावण्यात आली होती.

बीड, 27 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाच्या परिस्थिती आपले कर्तव्य बजावत आहे. बीडमध्ये एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली पण रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रात्रभर ड्युटी केली. बीडमधील परळी इथंही धक्कादायक घटना घडली आहे.  परळी शहर ठाण्यातील 42 वर्षीय पोलिस कर्मचारी हा बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी चेकपोस्टवर कर्तव्यास होता. शुक्रवारी त्याचा ‌‌स्वॅब‌ घेण्यात आला होता. त्यानंतरही त्यास शनिवारी ड्युटी देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचाऱ्याने अन्य दोन सहकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासोबत जोडवाडी चेकपोस्टवर ड्युटी केली. रात्री उशिरा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. हायवेवर शेकडो गाड्या असताना अचानक कोसळली दरड, पाहा थरारक LIVE VIDEO अखेर रविवारी रात्री या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करणे गरजेचं होतं. पण, रात्रभर रुग्णवाहिका आलीच नाही. पॉझिटिव्ह असतानाही रात्रभर त्या कर्मचाऱ्याने इतरांना लागण होणार नाही याची काळजी घेत कर्तव्य बजावले आणि सकाळी आठ वाजता सुटी झाल्यानंतर स्वतः गाडी चालवत  रुग्णालयात दाखल झाला. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे आज स्वॅब‌ घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 'देशाचं नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता',राऊतांनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा वाढता आकडा त्यात या प्रकारामुळे कोरोना संदर्भात प्रशासनाला गांभीर्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, परळीचा कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची माहिती रात्री उशीरा कळाली रुग्णवाहिका मिळाली नाही. त्या संबंधित कर्मचाऱ्यांने स्वॅब दिल्याचं इतरांना माहित नव्हते. तसेच कोणतेही लक्षण आढळून न आल्याने स्वतः दिवसभर ड्युटीवर होता. सकाळी माझी गाडी कोण घेऊन येईल म्हणून स्वतः गाडी चालवत तो हॉस्पिटलमध्ये गेला या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा झाला नाही, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली. दरम्यान, बीड जिल्ह्यात आज नव्याने 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 570 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 264 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 24 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात  एकूण 284 जणांवर उपचार सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: पोलीस, बीड

पुढील बातम्या