राज्यात यापुढे मेडिकलसाठी परप्रांतियांना प्रवेश नाही ?

राज्यात यापुढे मेडिकलसाठी परप्रांतियांना प्रवेश नाही ?

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी या वर्षीपासून परप्रांतीयांना प्रवेशबंदी करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाच यापुढे प्रवेश मिळणार आहे.

  • Share this:

10 मे : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी या वर्षीपासून परप्रांतीयांना प्रवेशबंदी करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाच यापुढे प्रवेश मिळणार आहे.

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परप्रांतिय विद्यार्थ्याला प्रवेश थांबवण्यात येणार असल्याचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाच प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जागा मोकळ्या होणार आहे.

याबद्दल राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. या निर्णयाची सर्व वैद्यकीय महाविद्यालयाना नियम लागू असणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यात एकूण तीन हजार जागा आहेत. दरवर्षी 15 ते 20 टक्के जागा या परप्रांतिय विद्यार्थ्यांच्या भरल्या जातात. त्यामुळे राज्यातील मराठी मुलांना प्रवेशापासून वंचित राहावं लागलं. जर हा निर्णय लागू झाला तर महाराष्ट्रीयन मुलांना  500 जागांचा फायदा होणार आहे.

First published: May 10, 2017, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading