...आणि YouTube वरून अचानक डिलीट व्हायला लागले इंदुरीकर महाराजांचे VIDEO

...आणि YouTube वरून अचानक डिलीट व्हायला लागले इंदुरीकर महाराजांचे VIDEO

वादग्रस्त वक्तव्यानंतर होत असलेल्या चर्चेनंतर वैतागून इंदुरीकर महाराज यांनी आपन कीर्तन सोडून शेती करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

पुणे, 15 फेब्रुवारी : ह. भ. प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या त्यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा होत आहे. यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याचं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत. त्यांनी वैतागून आपण कीर्तन सोडून शेती करण्याचा विचार करत असल्याचंही म्हटलं. इतकंच काय या वादग्रस्त वक्तव्यामुळे नगरमध्ये कीर्तनावेळी खासगी सुरक्षाव्यवस्थाही त्यांच्यासभोवती होती. दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ युट्यूबवर टाकून पैसे कमावणाऱ्यांना इशाराच दिला आहे. आपल्या नावावर युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळवणाऱ्यांना धडा शिकवण्याची तयारी इंदुरीकर महाराजांनी केली असल्याचं सांगितलं जात आहे. याचा धसका आता युट्यूब चॅनेलवाल्यांनी घेतला आहे. इंदुरीकरांचे व्हिडिओ युट्यूबवरून डिलीट केले जात आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इंदुरीकरांचे कीर्तनाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमात शूट करण्यात आलेले व्हिडिओ अनेकांनी त्यांच्या नावाने काढलेल्या किंवा इतर युट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. यातून लाखो रुपयांची कमाई युट्यूबर्स करतात. यातील रक्कम इंदुरीकर महाराजांना मिळात नाही. मात्र, यामध्ये काही युट्यूब चॅनेल्सकडून व्हिडिओमधील वादग्रस्त वक्तव्यांचे लहान व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यातून मोठी कमाई युट्यूबर्स करतात.

युट्यूबवर व्हिडिओ प्रसारीत करताना आपली परवानगी घेतली नसल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं. दरम्यान, कीर्तनाचे आयोजन करणाऱ्यांच्या परवानगीने आम्ही व्हिडिओ अपलोड केल्याचं युट्यूब चॅनेलवाल्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कारवाई कोणाविरुद्ध असा प्रश्न उभा राहिला आहे.

वाचा : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आणखी भर!

इंदुरीकर महाराजांना या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा धनी व्हावं तर लागलंच पण त्याच बरोबर त्यांच्या अडचणीतही वाढ झाली. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे. पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या  पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.

वाचा : इंदुरीकर संतापले, कीर्तनाला रामराम करून धरणार शेतीची वाट?

First published: February 15, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading