भिवंडी, 09 डिसेंबर : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील दापोडा येथील इजी मॅकेनिकल कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेमध्ये 4 कामगार गंभीर जखमी झाले आहे.
नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड गाळा नंबर बी-5 वळपाडा येथील जे.ई.मेकॅनिकल कंपनीमध्ये लोखंड कटिंग करण्यासाठी वापरला जाणारा नायट्रोजन गॅसच्या सिलेंडरचा दुपारी 1.40 वा. च्या सुमारास स्फोट होण्याची दुर्घटना घडली. या कंपनीत स्टीलचे कटिंग आणि वेल्डिंगचे काम करण्यात येते. आज काम सुरू असताना मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
मराठी-हिंदीवरून नवरा-बायकोत तूतू-मैंमै; लग्नानंतर 15 दिवसांतच गाठलं पोलीस ठाणे
या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी कामगारांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान, दोन जणांचा मृत्यू झाला. प्रेम अनंता भोईर (वय 24, राहणार धोंडा वडवली, ता भिवंडी) आणि अक्षय अशोक गौतम (वय 21, राहणार अंजुर फाटा, भिवंडी) अशी मृतांची नाव आहे.
केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, देशभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा
तर मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन (राहणार -भिवंडी, विवेकानंदा बारीकी (राहणार-वळपाडा, भिवंडी) आणि बजरंग शुक्ला (राहणार-पारसनाथ कंपाऊंड, भिवंडी) हे तिघेजण जखमी झाले आहे. हे तिन्ही जखमी कामगार लोटस हॉस्पिटल मानकोली येथे उपचार घेत आहेत. तर 4) अल्पेश भोईर या कामगाराला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे.चौकशी अंती यामध्ये दोषी असलेल्या बाबत माहितीसमोर येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.
भिवंडीत जम्बो गॅस सिलेंडरमुळे 744 कुटुंबाला धोका
दरम्यान, भिवंडी तालुक्यातील काल्हेर ओसीया माता कंपाऊंड, 33 विंग इमारतीमध्ये एकूण 744 कुटुंब राहतात. या इमारतीपासूनच 15 ते 20 फुटावर केमिकल गोदामे असून या ठिकाणी जम्बो गॅस सिलेंडरचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. आजच्या गॅसच्या स्फोटामुळे येथील 744 कुटुंबीयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नारपोली पोलीस, महसूल, एमएमआरडीए विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी समाजसेवक प्रकाश उमराडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.